Disabled Voters : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग मतदारांसाठी हेल्पलाईन सुरु

78
Deaf category : दिव्यांग मतदारांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरु
Deaf category : दिव्यांग मतदारांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरु

कर्णबधिर (मुकबधिर) प्रवर्गातील दिव्यांग मतदारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत ९२२६३६३००२ हा हेल्पलाईन क्रमांक सुरु केलेला आहे. या हेल्पलाईनवर कर्णबधिर मतदारांनी (Deaf voters) त्यांच्या मतदान केंद्रांची माहिती तसेच ईव्हीएम मशीन्सद्वारे (EVM Machines) मतदान कसे करावे याची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर (Election Officer Minal Kalaskar) यांनी केले आहे. (Disabled Voters)

(हेही वाचा – गणेशोत्सवात PMP ला १७ कोटी ४३ लाखांचे उत्पन्न)

कर्णबधिर व्यक्तींना (Disabled Voters) समजू शकणाऱ्या सांकेतिक भाषा (Sign Language) येणाऱ्या कर्णबधिर विद्यालयातील दोन शिक्षकांची नियुक्ती पुढील आदेशापर्यंत सकाळी ९.४५ ते सायं. ६.१५ या वेळे दरम्यान निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे. कर्णबधिर मतदारांनी व्हिडीओ कॉलद्वारे हेल्पलाईन क्रमांक ९२२६३६३००२ वर संपर्क करावा, असेही जिल्हा निवडणूक कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.