Cyber ​​Security : राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहता त्यांना लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घेतला पुढाकार

25
Cyber ​​Security : राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Cyber ​​Security : राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : एकीकडे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना, त्यांना लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ६ सप्टेंबर रोजी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. शिवाय, मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यामुळे ठाण्यातील मेट्रो प्रकल्पांना गती मिळणार आहे.

(हेही वाचा- Private Bus : खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरावर आता परिवहन विभागाचा अंकुश)

त्याव्यतिरिक्त मुंबईत जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्याच्या पर्यटन विभागाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात हे कर्ज मिळणार आहे. त्याचप्रमाणे केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट देण्यासह मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णयही कॅबिनेटमध्ये घेण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.