२३ ऑगस्टला PM Modi युक्रेन दौऱ्यावर, झेलेन्स्की यांच्यासोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

92
२३ ऑगस्टला PM Modi युक्रेन दौऱ्यावर, झेलेन्स्की यांच्यासोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
२३ ऑगस्टला PM Modi युक्रेन दौऱ्यावर, झेलेन्स्की यांच्यासोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २३ ऑगस्ट रोजी युद्धग्रस्त युक्रेनचा (Ukraine) दौरा करणार आहेत. रशिया आणि युक्रेन युक्रन यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध थांबावे व तिथे शांतता प्रस्थापित होण्याकरिता तोडगा काढण्यासाठी आम्ही सहकार्य करू इच्छितो, असे भारताकडून सांगण्यात आले.

(हेही वाचा – उल्हास नदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील पूरबाधितांविषयी निर्णय घेणार; DCM Devendra Fadanvis यांची घोषणा)

पंतप्रधान मोदी हे सर्वप्रथम पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथून ते युक्रेनला रवाना होतील. तेथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याबरोबर पंतप्रधान युद्धाबाबत चर्चा करतील. युक्रेनमधील संघर्ष थांबविण्यासाठी राजनैतिक प्रयत्न व चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यात यावा, अशी भारताची भूमिका आहे.

युक्रेन व रशियाोबत भारताचे चांगले संबंध

युक्रेन व रशिया (Ukraine Russia War) परस्परांविरोधात उभे ठाकले असले, तरी या दोन देशांशी भारताचे उत्तम संबंध आहेत. युक्रेनच्या युद्धाबाबत भारताने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी याआधी पाश्चिमात्य राष्ट्रांनी केली होती.

 हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.