मुंबईतील उद्यान, मैदानांच्या देखभालीसाठी पुन्हा कंत्राटदारांनी मिळवली ३० ते ४१ टक्के कमी दराने कामे: तब्बल १३८ कोटींचा खर्च

29
मुंबईतील उद्यान, मैदानांच्या देखभालीसाठी पुन्हा कंत्राटदारांनी मिळवली ३० ते ४१ टक्के कमी दराने कामे: तब्बल १३८ कोटींचा खर्च
मुंबईतील उद्यान, मैदानांच्या देखभालीसाठी पुन्हा कंत्राटदारांनी मिळवली ३० ते ४१ टक्के कमी दराने कामे: तब्बल १३८ कोटींचा खर्च

सचिन धानजी, मुंबई

मुंबईतील उद्यान, मनोरंजन मैदानासह मोकळ्या जागांची देखभाल करण्यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. मुंबईतील १९ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील मोकळ्या जागांच्या देखभालीसाठी या कंत्राटदारांची निवड करण्यात आली असून या कंत्राटदारांनी उणे ३० ते ४१ टक्के अर्थात महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा कमी बोली लावून ही कामे मिळवली आहेत. यासर्व उद्यान व मैदानांच्या देखभालीसाठी सुमारे १३८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. मात्र, मागील वर्षी या कामांसाठी ३० ते ४१ टक्के कमी बोली लावल्यामुळे निविदेत भाग घेणाऱ्या कंपन्यांची अनामत रक्कम जप्त करून निविदा प्रक्रिया रद्द करत नव्याने निविदा मागवली होती. परंतु यावर्षी अशाचप्रकारे कमी बोली लावून काम मिळवणाऱ्या कंपन्यांविरोधात यापूर्वी केलेल्या कारवाईचा बडगा न उचलता महापालिका प्रशासनाने चक्क त्यांना कामेच बहाल केली असल्याची माहिती समोर येत आहे.

(हेही वाचा – मुंबईत महापालिकेत कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची ३८० पदे रिक्त)

मुंबई महापालिकेच्या उद्यान, मनोरंजन मैदान, क्रीडांगणासह मोकळ्या जागांची देखभाल करण्यासाठी पुढील दीड वर्षांकरता निविदा मागवण्यात आली होती. या निविदेमध्ये १९ विभाग कार्यालयांमधील मोकळ्या जागांमधील देखभालीसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा ३० ते ४१ टक्के कमी बोली लावून कामे मिळवण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु एवढ्या कमी दरामध्ये ही कामे मिळवल्यानंतरही महापालिकेच्यावतीने कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. मागील वर्षी निविदा मागवताना एका कंत्राटदाराला एकाच विभागाचे काम सोपवण्यात येईल अशाप्रकारच्या अटींचा समावेश करण्यात आला होता. परंतु या निविदेमध्ये एका कंत्राटदाराला दोन विभागांमधील उद्यान देखभालींची कंत्राट सोपवण्यात आली आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागाने मागील वर्षी या निविदा मागवताना कमी बोली लावून काम मिळवणाऱ्या कंत्राटदारांवर संगनमत केल्याचा आरोप करत त्यांची अनामत रक्कम जप्त केली होती. परंतु यावर्षी अशाचप्रकारची बोली लावून काम मिळवणाऱ्या कंत्राटदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई नसून उलट त्यांना कामे बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे जी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना मागील वर्षी वाटत होती, ती भीती आता वाटली नाही का? की महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना चुकीची माहिती देऊन ही कारवाई करून काही ठराविक कंत्राटदारांना या कामांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न उद्यान विभागाने केला आहे का असाही प्रश्न उपस्थित होतो. विशेष म्हणजे कमला एंटरप्रायझेस, विकाश एंटरप्रायझेस आणि हिरावती एंटरप्रायझेस, एएसबी एंटरप्रायझेस या चार कंपन्यांना तर प्रत्येकी दोन विभागांमधील उद्यान, मैदानांच्या देखभालीची कामे सोपवली आहे.

अशाप्रकारे नेमले उद्यान, मनोरंजन मैदानांच्या देखभालीसाठी विभागनिहाय कंत्राटदार

ए विभाग : २२ मोकळ्या जागा
नेमलेला कंत्राटदार : शाह अँड पारिख
दीड वर्षांकरता होणारा खर्च : ३ कोटी ४५ लाख रुपये
महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा किती कमी व अधिक : ३०.३३ टक्के कमी

सी विभाग : ११ मोकळ्या जागा
नेमलेला कंत्राटदार : जगदंबा कॉर्पोरेशन
दीड वर्षांकरता होणारा खर्च : ८३ लाख ९३ हजार रुपये
महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा किती कमी व अधिक : ४१.३२ टक्के कमी

एफ/ उत्तर विभाग : ५८ मोकळ्या जागा
नेमलेला कंत्राटदार : हिरावती एंटरप्रायझेस
दीड वर्षांकरता होणारा खर्च : ५ कोटी ८३लाख रुपये
महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा किती कमी व अधिक : ३०.३३ टक्के कमी

जी /दक्षिण विभाग : २६ मोकळ्या जागा
नेमलेला कंत्राटदार : यश रिषभ ब्रदर्स
दीड वर्षांकरता होणारा खर्च : ४ कोटी ६५ लाख रुपये
महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा किती कमी व अधिक १४.०० टक्के कमी

जी /उत्तर विभाग : २२ मोकळ्या जागा
नेमलेला कंत्राटदार : खूशबू एंटरप्रायझेस
दीड वर्षांकरता होणारा खर्च : २ कोटी ७३ लाख रुपये
महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा किती कमी व अधिक : ३१.५० टक्के कमी

एच पूर्व विभाग : ३२ मोकळ्या जागा
नेमलेला कंत्राटदार : विकाश एंटरप्रायझेस
दीड वर्षांकरता होणारा खर्च : ३ कोटी १० लाख रुपये
महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा किती कमी व अधिक : ३०.२७ टक्के कमी

एच पश्चिम विभाग : ७८ मोकळ्या जागा
नेमलेला कंत्राटदार : एरिक इन्फ्रास्ट्रक्चर
दीड वर्षांकरता होणारा खर्च : ७ कोटी ९४ लाख रुपये
महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा किती कमी व अधिक : २८.८० टक्के कमी

के पूर्व विभाग : ९८ मोकळ्या जागा
नेमलेला कंत्राटदार : कमला कस्ट्रक्शन
दीड वर्षांकरता होणारा खर्च : १४ कोटी ७७लाख रुपये
महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा किती कमी व अधिक : ३२.११ टक्के कमी

के पश्चिम विभाग : ११४ मोकळया जागा
नेमलेला कंत्राटदार : कमला कस्ट्रक्शन
दीड वर्षांकरता होणारा खर्च : १८ कोटी ५६ लाख रुपये
महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा किती कमी व अधिक : ३२.११ टक्के कमी

पी दक्षिण विभाग : ६५ मोकळ्या जागा
नेमलेला कंत्राटदार : एएसबी एंटप्रायझेस
दीड वर्षांकरता होणारा खर्च : १३ कोटी ०० लाख रुपये
महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा किती कमी व अधिक : ३२.११ टक्के कमी

आर दक्षिण विभाग : ४६ मोकळ्या जागा
नेमलेला कंत्राटदार : हिरावती एंटरप्रायझेस
दीड वर्षांकरता होणारा खर्च : ९ कोटी ०६ लाख रुपये
महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा किती कमी व अधिक : २८.९० टक्के कमी

आर मध्य विभाग : ४५ मोकळ्या जागा
नेमलेला कंत्राटदार : विकाश एंटरप्रायझेस
दीड वर्षांकरता होणारा खर्च : ५ कोटी ६४ लाख रुपये
महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा किती कमी व अधिक : ३५.२७ टक्के कमी

आर उत्तर विभाग : ५२ मोकळ्या जागा
नेमलेला कंत्राटदार : वरुण कंस्ट्रक्शन्स
दीड वर्षांकरता होणारा खर्च : ६ कोटी ९२ लाख रुपये
महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा किती कमी व अधिक : ३४.०२ टक्के कमी

एल विभाग : ३९ मोकळ्या जागा
नेमलेला कंत्राटदार : आर. शाह सिव्हिल इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड
दीड वर्षांकरता होणारा खर्च : ६ कोटी ०७ लाख रुपये
महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा किती कमी व अधिक : ३२.४०टक्के कमी

एम पूर्व विभाग : ३८ मोकळ्या जागा
नेमलेला कंत्राटदार : आर एस कंस्ट्रक्शन
दीड वर्षांकरता होणारा खर्च : ४ कोटी ३५ लाख रुपये
महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा किती कमी व अधिक : ३०.३३ टक्के कमी

एम पश्चिम विभाग : ४५ मोकळ्या जागा
नेमलेला कंत्राटदार : डि बी इन्फ्राटेक
दीड वर्षांकरता होणारा खर्च : ११ कोटी ११ लाख रुपये
महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा किती कमी व अधिक : २४. ६१ टक्के कमी

एन विभाग : ५१ मोकळ्या जागा
नेमलेला कंत्राटदार : विकाश एंटरप्रायझेस
दीड वर्षांकरता होणारा खर्च : ५ कोटी ७५ लाख रुपये
महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा किती कमी व अधिक : ३५.५७ टक्के कमी

एस विभाग : ४४ मोकळ्या जागा
नेमलेला कंत्राटदार :एएसबी एंटरप्रायझेस
दीड वर्षांकरता होणारा खर्च : ८ कोटी १३ लाख रुपये
महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा किती कमी व अधिक १९.२० टक्के कमी

टी विभाग : ५४ मोकळ्या जागा
नेमलेला कंत्राटदार : बालाजी एंटरप्रायझेस
दीड वर्षांकरता होणारा खर्च : ५कोटी ५९ लाख रुपये
महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा किती कमी व अधिक : २५.७७ टक्के कमी

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.