दहशतवादासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र या; ग्लोबल साउथ देशांना PM Modi यांचे आवाहन

109
दहशतवादासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र या; ग्लोबल साउथ देशांना PM Modi यांचे आवाहन
दहशतवादासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र या; ग्लोबल साउथ देशांना PM Modi यांचे आवाहन

जगभरातील गंभीर आव्हानांचा सामना करण्यासाठी एकजुटीने काम करा. अन्नसुरक्षा, ऊर्जा संकट आणि दहशतवादासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्लोबल साउथचे सदस्य असलेल्या देशांना केले. या वेळी त्यांनी जगभरातील अनिश्चिततेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ (Global South countries) शिखर परिषदेच्या तिसऱ्या आवृत्तीच्या उद्घाटनप्रसंगी मोदी (PM Modi) बोलत होते. भारत सरकारने डिजिटल पद्धतीने ही परिषद आयोजित केली आहे.

(हेही वाचा – Road Accident : राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट; धोका मात्र कायम)

पंतप्रधान मोदी म्हणाले, एकजूट हीच आपली ताकद दहशतवाद, अतिरेकवाद, फुटीरतावादाचा आपल्या समाजाला गंभीर धोका आहे. या धोक्यासोबतच तंत्रज्ञानाचे होणारे विभाजन, तंत्रज्ञानाशी संबंधित नवीन आर्थिक आणि सामाजिक आव्हानेदेखील निर्माण होत आहेत. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या उद्देशाने ‘सोशल इम्पॅक्ट फंड’मध्ये भारत सरकार २५ दशलक्ष डॉलर्सचे प्रारंभिक योगदान देणार आहे. परस्पर व्यापार व शाश्वत विकासाचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ग्लोबल साउथ किंवा विकसनशील देशांसोबत आपली क्षमता सामायिक करण्यास वचनबद्ध आहे. जी-२० परिषदेचा अध्यक्ष असताना, भारताने ग्लोबल साउथ देशांना दिलेले महत्त्व यावेळी मोदींनी अधोरेखित केले.

व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले, गेल्या शतकात निर्माण झालेले जागतिक प्रशासन व वित्तीय संस्था या शतकातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम नाहीत.आजच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ग्लोबल साउथच्या देशांनी एकजूट होत एकमेकांची ताकद बनणे ही काळाची गरज आहे. आपण सर्वजण आपापल्या अनुभवांची देवाण-घेवाण करण्यासोबत एकत्रितपणे आपले संकल्प पूर्ण करू शकतो. आपण सर्व एकत्र आलो, तर दोन तृतीयांश मानवतेला मान्यता मिळवून देऊ शकतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.