Spy Ship Research Mission: चिनी हेरगिरी जहाज श्रीलंकेत दोन दिवस संशोधन करणार, भारताचा आक्षेप

गेल्या वर्षी संशोधनाच्या नावाखाली चीनचे युआन वांग-५ श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात पोहोचले होते.

13
Spy Ship Research Mission: चिनी हेरगिरी जहाज श्रीलंकेत दोन दिवस संशोधन करणार, भारताचा आक्षेप
Spy Ship Research Mission: चिनी हेरगिरी जहाज श्रीलंकेत दोन दिवस संशोधन करणार, भारताचा आक्षेप

चीनचे शी यान-६ हे जहाज २५ ऑक्टोबरपासून तळ ठोकू आहे. श्रीलंकेच्या नौदलाने त्याला सागरी संशोधन करण्याची परवानगी दिली आहे. हे चिनी जहाज उद्यापासून म्हणजेच ३० ऑक्टोबरपासून संशोधन सुरू करणार आहे. हे सागरी संशोधन दोन दिवस चालणार असून हिंदी महासागरात (Spy Ship Research Mission) चीनचा हस्तक्षेप वाढत असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी संशोधनाच्या नावाखाली चीनचे युआन वांग-५ श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात पोहोचले होते. भारताने याला विरोध केला होता. असे असतानाही वर्षभरानंतर चीनने संशोधनाच्या नावाखाली आणखी एक प्रगत जहाज श्रीलंकेला पाठवले आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation : मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा, योग्य निर्णयासाठी प्रयत्न सुरू आहेत; उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन )

कोलंबो बंदरावर नांगरलेल्या या चिनी जहाजावरून भारताला हेरगिरीचा धोका आहे. सप्टेंबरमध्ये नवी दिल्लीत झालेल्या G-20 बैठकीनंतर चीनने आपल्या सर्वेक्षण जहाजासाठी मंजुरी मागितली होती. त्यानंतर श्रीलंकेच्या नौदलाने संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला शिफारस पाठवली.

चिनी जहाजात लष्करी यंत्रणा
आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूचे अनेक समुद्रकिनारे श्रीलंकेच्या बंदरांवर येणाऱ्या चिनी जहाजांच्या हल्ल्यात येतात. यावर तज्ज्ञांचे म्हणणे असे की, चीनने हे जहाज श्रीलंकेला भारताच्या मुख्य नौदल तळ आणि अणु प्रकल्पांची हेरगिरी करण्यासाठी पाठवले आहे. चीनची हेर जहाजे हायटेक इव्हड्रॉपिंग उपकरणांनी सुसज्ज आहेत. म्हणजेच श्रीलंकेच्या बंदरावर उभे राहून भारताच्या अंतर्गत भागापर्यंतची माहिती गोळा करू शकते

माहिती चोरण्याची शक्यता…
पूर्व किनारपट्टीवर असलेले भारतीय नौदल तळ या जहाजाच्या हेरगिरीच्या कक्षेत असतील, चांदीपूरमधील इस्त्रोच्या प्रक्षेपण केंद्राचीही हेरगिरी केली जाऊ शकते. २३ सप्टेंबर रोजी मलाक्काच्या सामुद्रधुनीतून हिंदी महासागरात पोहोचले. १० सप्टेंबर रोजी त्याचे होमपार्ट ग्वांगझू सोडल्यानंतर १४ सप्टेंबर रोजी ते सिंगापूरमध्ये दिसले होते.

चीनची हेर जहाजे अतिशय शक्तिशाली…
अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अहवालानुसार, चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मी (PLA)च्या स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स (SSF)द्वारे चालवले जाते. SSF ही थिएटर कमांड लेव्हल संस्था आहे. हे PLAला अंतराळ, सायबर, इलेक्ट्रॉनिक, माहिती संप्रेषण आणि मनोवैज्ञानिक युद्ध मोहिमांमध्ये मदत करते. चीनची हेर जहाजे अतिशय शक्तिशाली असून भारत किंवा कोणताही देश क्षेपणाश्त्राच्या चाचण्या घेताना ही जहाजे हालचाली सुरू करतात. या जहाजाला उच्च तंत्रज्ञान उपकरणे बसवण्यात आली आहेत. याच्या मदतीने ते १,००० किमी अंतरावर होणारे संभाषण ऐकू शकते. चीनकडे अनेक हेरगिरी जहाजे असून ती संपूर्ण पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरात कार्य करण्यास सक्षम आहेत. ही जहाजे हेरगिरी करतात आणि बीजिंगमधील जमीन-आधारित ट्रॅकिंग स्टेशनला संपूर्ण माहिती पाठवतात. चीन युआन वांग वर्गाच्या जहाजांद्वारे उपग्रह, रॉकेट आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणाचा मागोवा घेतला जातो.

श्रीलंकेसाठी भारतीय सुरक्षा महत्त्वाची…
श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी म्हणाले की, श्रीलंकेसाठी भारतीय सुरक्षेची चिंता महत्त्वाची आहे. श्रीलंकेच्या बंदरावर चिनी जहाज शी यान -६च्या थांब्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, श्रीलंकेत परदेशी जहाजे थांबण्यासाठी एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) तयार करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.