Cement Concrete Road : रस्त्याचा दर्जा, गुणवत्ता राखण्यासाठी आयआयटीची नियुक्ती

1182
Cement Concrete Road : रस्त्याचा दर्जा, गुणवत्ता राखण्यासाठी आयआयटीची नियुक्ती
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) यांची गुणवत्‍ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्‍यामुळे रस्ते विकासाची अंमलबजावणी करताना आवश्यक तो दर्जा, गुणवत्ता राखण्याची जबाबदारी भारतीय तंत्रज्ञान संस्थेकडे असेल. या कामकाजासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्‍यात ११ सप्‍टेंबर २०२४ रोजी सामंजस्‍य करार (MoU) करण्‍यात आला आहे. (Cement Concrete Road)

सामंजस्‍य कराराच्या प्रतीचे आदानप्रदान

मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षऱ्या करण्‍यात आल्‍या. महानगरपालिकेच्‍यावतीने प्रमुख अभियंता (रस्‍ते व वाहतूक) गिरीश निकम यांनी तर, भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍यावतीने अधिष्‍ठाता (संशोधन व विकास) प्रा. सचिन पटवर्धन यांनी स्‍वाक्षरी केली. यावेळी भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे उपसंचालक प्रा. के. व्‍ही. कृष्‍ण राव, अधिष्‍ठाता पी. वेदगिरी, प्रा. सोलोमन देबबर्मा यांच्‍यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. स्‍वाक्षरीनंतर सामंजस्‍य कराराची प्रत आदानप्रदान करण्‍यात आली. (Cement Concrete Road)

(हेही वाचा – Rahul Gandhi आरक्षण मुद्द्यावर संभ्रमात; नेटकऱ्यांनी घेरले)

दुसऱ्या टप्प्यातील पाच आणि पहिल्या टप्प्यातील एक अशाप्रकारे सहा कामांची जबाबदारी

मुंबईच्या हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर तर दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरातील रस्ते कामांचा समावेश आहे. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था यांची गुणवत्‍ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था (थर्ड पार्टी) म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी घेतला आहे. त्‍या अनुषंगाने बुधवारी ११ सप्‍टेंबर २०२४ रोजी महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्‍यात सामंजस्‍य करार (MoU) करण्‍यात आला आहे.

दुसऱ्या टप्‍प्‍यातील ५ पॅकेज (शहर विभाग १, पूर्व विभाग १ आणि पश्चिम विभाग ३) आणि पहिल्‍या टप्‍प्‍यातील १ पॅकेजच्‍या कामांची गुणवत्ता तपासणी व अनुषंगिक कामे आयआयटी मार्फत केली जाणार आहेत. (Cement Concrete Road)

(हेही वाचा – Sharad Pawar यांच्या उपस्थितीत महारावांकडून श्रीराम, स्वामी समर्थांचा अवमान; गुरुवारी राज्यभर आंदोलन)

कामे करताना गुणवत्ता ढासळू नये यासाठी

भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्‍या नियुक्‍तीमुळे सिमेंट काँक्रिट रस्‍त्‍यांच्‍या कामात अत्‍युच्‍च गुणवत्‍ता राखली जावी यासाठी मदत होणार आहे. अधिक गतीने कामे करताना गुणवत्‍ता ढासळू नये यासाठी कोणत्‍या बाबींची काळजी घ्‍यावी यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मार्गदर्शन करणार असल्याचे या सामंजस्‍य करार स्‍वाक्षरीप्रसंगी बोलतांना महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले

मटेरियल बनवण्यापासून ते रस्ता बनवण्यापर्यंतची जबाबदारी

रस्ते विकासाची अंमलबजावणी करताना जाणीवपूर्वक कमी गुणवत्‍तेचे कामकाज होऊ नये म्‍हणून दक्षता (vigilance) घेणे, यांबरोबरच कामाची अंमलबजावणी करताना अजाणतेमुळे होणाऱ्या चुका टाळण्‍यासाठी मार्गदर्शन आणि अत्‍युच्‍च गुणवत्‍तेची काळजी घ्‍यावयाची बाबी या सर्व बाबींमध्‍ये भारतीय तंत्रज्ञान संस्‍था मार्गदर्शन करेल. आकस्मिक भेटी (surprise visit), कार्यस्‍थळास प्रत्‍यक्ष भेट देणे, त्‍याबाबतची निरीक्षणे नोंदविणे, भेटीच्‍या दरम्‍यानची निरीक्षणे आणि त्‍यावरील सल्‍ला यांबाबत वेळोवेळी अभियांत्रिकी विभागास अधिकाऱ्यांसोबत प्रतिसाद मिळवेल. (feedback session) काँक्रिट प्लांटमध्‍ये मटेरियल बनविण्‍याच्‍या टप्‍प्‍यापासून ते काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण झाल्‍यानंतरच्‍या विविध चाचण्‍यांद्वारे भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्‍या माध्‍यमातून तपासणी केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले. (Cement Concrete Road)

(हेही वाचा – Supriya Sule यांनी Devendra Fadnavis यांच्यावर टीका केली अन् अंगलट आली…)

काय असेल आयआयटीचे काम

रस्‍त्‍यांच्‍या देखभाल, पुनर्रचना व पुनर्वसनासाठी योग्‍य पद्धती निश्चित करण्‍याकामी आवश्‍यक सल्‍ला देणे, प्रत्‍येक प्रकरणाच्‍या आधारे आवश्‍यकतेनुसार तपासणी करणे, गुणवत्ता तपासणीचे निकष प्रत्येक प्रकरणाच्या आवश्यकतेनुसार तपासणे, गुणवत्ता आश्वासनासाठी चाचण्या घेणे आणि गुणवत्ता नियंत्रण चाचणी अहवालांची तपासणी करणे, तांत्रिक लेखापरीक्षण अहवाल तयार करणे आणि गुणवत्तेची खात्री करण्यासाठी नियमितपणे प्रकल्‍पस्‍थळास भेटी देणे इत्‍यादी बाबींचा समावेश भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्‍या कामकाजाच्‍या व्‍याप्‍तीत करण्‍यात आला आहे. (Cement Concrete Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.