Buldhana Accident : बसचालकाला झोप लागल्याने अपघात, 8 प्रवासी जखमी

चालकाची प्रकृती चिंताजनक

22
Buldhana Accident : बसचालकाला झोप लागल्याने अपघात, 8 प्रवासी जखमी
Buldhana Accident : बसचालकाला झोप लागल्याने अपघात, 8 प्रवासी जखमी

बुलढाण्यात जुन्या मुंबई-पुणे-नागपूर महामार्गावर सुलतानपूरजवळ खासगी बसला अपघात झाला. बस चालकाला झोप लागल्याने भरधाव बसवरील नियंत्रण सुटून बस पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात 7 ते 8 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन प्रवासी गंभीर आहेत.

साई अमृत ट्रॅव्हल्सची बस पुण्याहून नागपूरकडे जात होती. सकाळी 7.15 वाजता अपघात झाला.बसमध्ये 35 प्रवासी होते. अनियंत्रित होऊन बस सुरुवातीला झाडाला धडकली आणि नंतर पलटी झाली. अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस आणि स्थानिकांनी जखमी प्रवाशांना मदत केली. जखमींवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील उपचारासाठी संभाजीनगर इथे नेण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.