मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती Alok Aradhe यांना राज्यपाल देणार शपथ

101

मुंबई उच्च न्यायालयाचे (Bombay High Court) नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती (Chief Justice) म्हणून आलोक आराधे हे मंगळवारी शपथ घेणार आहेत. राजभवन (Raj Bhavan) येथे सायंकाळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (Governor C.P. Radhakrishnan) हे न्यायमूर्ती आराधे यांना मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ देतील. तर मावळते मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्य (Chief Justice Devendra Kumar Upadhyay) यांची दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे.  (Alok Aradhe)

(हेही वाचा – सत्तेवर येताच तृतीयपंथियांविषयी Donald Trump यांची मोठी घोषणा; म्हणाले…)

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने ७ जानेवारी रोजी तेलंगणाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कार्यरत असलेल्या आराधे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्तीची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर, त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारने राष्ट्रपतींकडे पाठवला होता. त्याला राष्ट्रपतींनी गेल्या आठवड्यात मंजुरी दिली.

न्यायमूर्ती आराधे हे मूळचे मध्यप्रदेश येथील आहेत. त्यांची २००९ मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्यानंतर २०११ मध्ये ते कायमस्वरूपी न्यायमूर्ती झाले. त्यानंतर, २०१६ मध्ये न्यायमूर्ती आराधे यांची जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात बदली झाली आणि २०१८ मध्ये त्यांनी तिथे तीन महिने प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले. पुढे, १७ नोव्हेंबर २०१८ रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती आराधे यांनी शपथ घेतली आणि तेथेही २०२२ मध्ये त्यांनी काही महिने प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले. जुलै २०२३ मध्ये न्यायमूर्ती आराधे .यांची तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

(हेही वाचा – Mumbai-Pune Expressway वर तीन दिवसांचा Traffic block; कोणत्या मार्गांवर असणार वाहतूक सुरु? वाचा…)

तसेच,  मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली करण्यात आली. मूळचे अलाहाबाद येथील असलेले न्यायमूर्ती उपाध्याय यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदभार स्वीकारला होता.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.