Gorai Water Issue : गोराईतील गावकऱ्यांची पाणी टंचाई मिटणार

जलवाहिन्या टाकण्याचे कामही हाती घेण्यात येणार असल्याने गोराईकरांची लवकरच पाणी टंचाईची समस्या आता कायमची निकालात निघणार

32
Gorai Water Issue : गोराईतील गावकऱ्यांची पाणी टंचाई मिटणार
Gorai Water Issue : गोराईतील गावकऱ्यांची पाणी टंचाई मिटणार

बोरीवली पश्चिम येथील गोराई गावठाण, उत्तन रोड व ग्लोबल पगोडा तसेच खाडीपलिककडे पुरेशा दाबाने पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गोराई चर्च बस थांब्याजवळ उदंचन केंद्र अर्थात पंपिंग स्टेशन आता उभारण्यात येणार आहे.याशिवाय जलवाहिन्या टाकण्याचे कामही हाती घेण्यात येणार असल्याने गोराईकरांची लवकरच पाणी टंचाईची समस्या आता कायमची निकालात निघणार असल्याची माहिती मिळत आहे. (Gorai Water Issue)

बोरीवलीतील पाणी पुरवठयात सुधारणा करण्याकरिता जलवाहिन्या टाकणे, छेद जोडण्या करणे ही कामे प्राधान्य क्रमाने जल अभियंता विभागाने हाती घेतले आहे. यामध्ये गोराई गावासाठी १.२६ लाख लीटर क्षमतेची शोषण टाकी बांधण्यासह पंपिंग स्टेशनही बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय  १५०मि.मी. ते ३००मि.मी व्यासांच्या जलवाहिन्या टाकणे तसेच तिथे संरक्षण भिंत बांधणे इत्यादी कामे आहे.  या कामांमध्ये गोराई गावठाण, उत्तन रोड व ग्लोबल पगाडा, खाडीपलिकडे पाण्याची व्यवस्था आदींचा समावेश असून यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

(हेही वाचा :Carnac Bridge : कर्नाक बंदर पुलाच्या बांधकामात अडसर, बेस्टचे सब स्टेशन अन्यत्र हलवणार)

या जलवाहिन्या महापालिकेच्या जागेवर टाकल्या जाणार असल्या तरी शोषण टाकी व पंपिंग स्टेशन हे जिल्हाधिकारी यांच्या जागेत केली जाणार आहेत. तसेच हा परिसर सीआरझेड  क्षेत्रात येत असल्याने यासाठीच्या परवानग्याही घेण्यात आल्या आहेत. या कामांसाठी विविध करांसह साडे नऊ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कामांकरता समृध्दी एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली असून पावसाळा वगळून हे काम ९ महिन्यांमध्ये पूर्ण केले जाईल असे जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.