-
विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबईतील मिठीनदीच्या सुशोभीकरणासाठी पहिल्या काही टप्प्यातील कामे होती घेतल्यानंतर सीएसटी पूल (CST Bridge) ते कुर्ला (Kurla) आणि तिथून पुढे माहिमपर्यंतच्या मिठीच्या अंतिम टप्प्यातील कामांसाठी महापालिकेने (BMC) निविदा मागवली आहे. या मिठी नदीच्य (Mithi River) सुशोभीकरणासाठी तब्बल २३०० कोटी रुपये खर्च येणार आहे.मात्र एका बाजुला जिथे पर्जन्य जलवाहिनी विभागासाठी वार्षिक तरतूदच २२०० कोटी रुपये आहे, तिथे मिठी नदीच्या (Mithi River) एका कामांसाठीच महापालिका २३०० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. त्यामुळे खरोखरच मिठी नदीच्या (Mithi River) सुशोभीकरणाचे काम अत्यावश्यक आहे का असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
(हेही वाचा – Longest River In India : भारतातील 10 सर्वात लांब नद्या कोणत्या तुम्हाला ठाऊक आहेत का ?)
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी महापालिकेतील (BMC) खर्चाचे सुसूत्रीकरण करताना संबंधित वर्षांमधील महसुली खर्च उपलब्ध तरतुदीच्या मर्यादेत नियंत्रित करण्यात येणार असल्याचे स्षष्ट केले. त्यामुळे अत्यावश्यक व टाळता येणारी कामे हाती घेण्याकरता त्या कामासाठी लागणाऱ्या निधीच्या उपलब्धतेची खात्री केल्यानंतरच संबंधित कामे विहित कामे पध्दतीने हाती घेण्याकरता प्राधान्य दिले जाईल,असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – Mhada आणि एसआरएच्या संयुक्त भागीदारीत राबवणार १७ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प)
एका बाजुला आवश्यक असलेले प्रकल्प कामे तसेच सुविधांची कामे हाती घेतली जाईल असे सांगितले जात असतानाच आयुक्तांनी तब्बल २३०० कोटी रुपये खर्च करून हाती घेण्यात येणाऱ्या मिठी नदीच्या (Mithi River) अंतिम टप्प्यातील सुशोभीकरणाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली असून त्यानुसार या कामांसाठीची निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या एकूण अर्थसंकल्पीय तरतूदच आगामी वर्षांत २२०० कोटी रुपये असून मिठी नदीच्या (Mithi River) सीएसटी पूल कुर्ला (Kurla) ते माहिमपर्यंतच्या (Mahim) भागाचे सुशोभीकरण करण्यासाठी २३०० कोटी रुपये खर्च करण्यासाठी निविदा मागवून प्रकल्प हाती घेण्यात येत असल्याने आयुक्तांच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित केली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community