BMC : ऊर्जा, वाहने आणि कचऱ्यापासून होणारे प्रदुषण सन २०५० पर्यंत शुन्यावर येणार

शहरातील (BMC) पूर आणि जल संसाधन व्यवस्थापन, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध प्रकल्पांची उभारणी, जैवविविधतेचे जतन करण्यासाठी उपाययोजनांसह वातावरणपूरक विविध प्रकल्पांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रतिनिधींना यावेळी देण्यात आली.

125
BMC : ऊर्जा, वाहने आणि कचऱ्यापासून होणारे प्रदुषण सन २०५० पर्यंत शुन्यावर येणार

मुंबई (BMC) शहराला उष्णता, भूस्खलन, पूर, हवा प्रदुषणासह विविध नैसर्गीक आपत्तींचा सामना करावा लागतो. या आपत्तींचा सामना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये वातावरणपूरक प्रकल्पांची रचना, शहरातील वाढत्या उष्णतेवर परिणामकारक उपाय, ग्रीन हाऊसचा समावेश या आराखड्यात आहे. तसेच ऊर्जा, वाहने आणि कचऱ्यापासून होणारे प्रदुषण २०५० पर्यंत शुन्यावर आणण्याचे मुंबई महानगरपालिकेचे उदिष्ट आहे. यासाठी टप्पेनिहाय पद्धतीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने (BMC) स्पष्ट केले.

(हेही वाचा – Mega Beach Clean Drive : मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईतील जुहू चौपाटीवर जी -२० परिषद अंतर्गत ‘मेगा बीच क्लीन’ ड्राइव्हचे आयोजन)

‘दक्षिण आशियातील शहरांमध्ये हवामानपूरक प्रकल्पांची रचना करणे आणि त्यासाठी वित्तपुरवठा वाढवणे’ या विषयावर एक विशेष कार्यशाळा नुकतीच मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विविध देशांतील (BMC) महानगरपालिका, तसेच भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. या दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोप हा मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता. या समारोपीय कार्यक्रमाला महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, ‘एमसीजीएम सेंटर फॉर म्युनिसिपल कॅपेसिटी बिल्डिंग अँड रिसर्च’चे महासंचालक डॉ. रमानाथ झा, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स’ या संस्थेचे संचालक डॉ. हितेश वैद्य यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी ‘एमसीजीएम सेंटर फॉर म्युनिसिपल कॅपेसिटी बिल्डिंग अँड रिसर्च’ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स यांच्यादरम्यान वातावरण क्षमता प्रशिक्षण उपक्रमासंदर्भात करारही करण्यात आला. यावेळी उपायुक्त (पर्यावरण) अतुल पाटील, उद्यान अधिक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या कार्यशाळेसाठी भूतान, बांग्लादेश, नेपाळ व श्रीलंका या देशांमधील महानगरपालिकांचे (BMC) महापौर आणि तेथील महानगरपालिकांचे आयुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते. तर भारतातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींनीही या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमादरम्यान अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने उपस्थित प्रतिनिधींसमोर संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेने (BMC) बनवलेल्या ‘मुंबई वातावरण कृती आराखड्या’चे सादरीकरण केले. समारोप कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात विविध देशांमधून आलेल्या प्रतिनिधींनी महानगरपालिकेच्या उद्यान व पर्यावरण विषयक कार्याबाबत माहिती जाणून घेतली.

हेही पहा – 

याप्रसंगी शहरातील (BMC) पूर आणि जल संसाधन व्यवस्थापन, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध प्रकल्पांची उभारणी, जैवविविधतेचे जतन करण्यासाठी उपाययोजनांसह वातावरणपूरक विविध प्रकल्पांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रतिनिधींना यावेळी देण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.