• होम
  • सत्ताबाजार
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
29 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Tuesday, October 3, 2023
Facebook
Instagram
Twitter
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home समाजकारण BMC : जोशींच्या आगमनापूर्वीच आयुक्तांनी महत्वाची खाती सोपवली शिंदेंकडे!
  • समाजकारण

BMC : जोशींच्या आगमनापूर्वीच आयुक्तांनी महत्वाची खाती सोपवली शिंदेंकडे!

September 18, 2023
1211
Facebook
Twitter
WhatsApp
Email
    BMC : जोशींच्या आगमनापूर्वीच आयुक्तांनी महत्वाची खाती सोपवली शिंदेंकडे!

    मुंबई महापालिकेत (BMC) मागील दीड महिन्यांपेक्षा अधिक काळ रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्त (शहर) या पदावर अखेर डॉ. अश्विनी जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. मात्र, डॉ. जोशी यांच्या नियुक्तीचे शासन आदेश गुरुवारी १४ सप्टेंबर २०२३ रोजी जारी होताच महापालिका आयुक्तांनी तातडीने अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्याकडे असलेल्या खात्यांची अदलाबदली करून टाकली. डॉ.जोशी यांनी पदभार घेण्यापूर्वीच या खात्यांची अदलाबदल करून घेतल्यामुळे त्यांच्या परत येण्याचा अधिकाऱ्यांनी धसका घेतला की काय अशी शंका उपस्थित होत आहे.

    अतिरिक्त आयुक्त (शहर) पदी डॉ अश्विनी जोशी यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच आयुक्तांनी अशाप्रकारे खात्यांची (BMC) अदलाबदल करत डॉ. सुधाकर शिंदे यांच्या झोळीत अधिकचे माप टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्याकडील पदभारासंदर्भात गुरुवारी १४ सप्टेंबर २०२३ रोजी एक तातडीने परिपत्रक जारी झाले. ज्यामध्ये अतिरिक्त आयुक्त शहर यांच्याकडे असलेले मालमत्ता खाते, बाजार, कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आणि उपप्रमुख अभियंता (सुधार) यांच्याशी निगडीत कामकाजाची खाती परस्पर अतिरिक्त आयुक्त (पश्चिम) उपनगरे डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे वळवली, आणि त्यांच्याकडील पर्यावरण अभियांत्रिकी संबंधीचे कामकाज आणि निवडणूक ही खाती अतिरिक्त आयुक्त (शहर) म्हणजेच डॉ अश्विनी जोशी यांच्याकडे वळवण्यात आली. डॉ.अश्विनी जोशी यांनी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून यापूर्वी काम केलेले असून त्यांना प्रत्येक खात्याची आणि अधिकाऱ्यांची कुंडली ठाऊक आहे. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी जोशी यांना घाबरुन ही खाती आयुक्तांना सांगून त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच वळती करून घेतली की काय अशी शंका उपस्थित होत आहे.

    (हेही वाचा – Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाहीच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

    आजवर अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्याकडे असलेली मालमत्ता, बाजार, कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आणि उपप्रमुख अभियंता (सुधार) यांच्याशी निगडीत कामकाजाची खाती यापूर्वी दीड महिन्यांपासून हे पद रिक्त असल्याने (BMC) अतिरिक्त आयुक्त(प्रकल्प) पी.वेलरासू यांच्याकडे याचा अतिरिक्त कार्यभार असताना का अतिरिक्त आयुक्त (पश्चिम) उपनगरे यांना देण्यात आली नाही. अश्विनी जोशी या महापालिकेत परतणार अशी माहिती मिळताच एका रात्रीत याबाबतच्या सूचना करत परिपत्रक जारी केल्याने आयुक्तांसह महापालिकेतील काही अधिकाऱ्यांमध्ये एकप्रकारे भीती पसरलेली आहे आणि या बदलेल्या पदभारामुळे हे स्पष्ट होत आहे.

    डॉ.अश्विनी जोशी यांनी यापूर्वी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) विभागाचा पदभार सांभाळला होता. त्यामुळे त्यांनी (BMC) आरोग्य विभागासह मुंबई अग्निशमन दल, आपत्कालिन व्यवस्थापन आराखडा आदींसह प्रमुख खात्यांचा कार्यभार सांभाळला होता.

    हेही पहा – 

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • Account Transfer
    • Additional Commissioner
    • Dr Sudhakar Shinde
    • Dr. Ashwini Joshi
    • Mumbai Municipality
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Email
      Previous articleMaratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाहीच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
      Next articleSpecial Session : जुनं संसद भवन पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील – पंतप्रधान नरेंद्र मोदी
      kasarshrutika29@gmail.com

      Latest News

      • NewsClick च्या संपादकाला अटक; चीनकडून पैसा घेतल्याचा आरोप October 3, 2023
      • State Cabinet : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय October 3, 2023
      • Varsha Gaikwad : साडेतीन महिन्यांनंतरही वर्षा गायकवाड यांचे महापालिकेच्या कारभारावर नाही लक्ष October 3, 2023
      • Asian Games : पारुल चौधरीने रचला इतिहास, ५००० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक मिळवले ! October 3, 2023
      • Worli BDD Chawl : वरळीत तीन आमदार तरीही, बीडीडीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य October 3, 2023

      Subscribe to Our Newsletter

      Get The Latest News!
      Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

      Check your inbox or spam folder to confirm your subscription.

      Join Our WhatsApp Community

      Popular

      • NewsClick च्या संपादकाला अटक; चीनकडून पैसा घेतल्याचा आरोप October 3, 2023
      • State Cabinet : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय October 3, 2023
      • Varsha Gaikwad : साडेतीन महिन्यांनंतरही वर्षा गायकवाड यांचे महापालिकेच्या कारभारावर नाही लक्ष October 3, 2023
      • Asian Games : पारुल चौधरीने रचला इतिहास, ५००० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक मिळवले ! October 3, 2023
      • Worli BDD Chawl : वरळीत तीन आमदार तरीही, बीडीडीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य October 3, 2023
      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      error: Content is protected !!