BMC Budget : आमदार, खासदार यांना यंदा प्रत्येकी १५ कोटींचा विकासनिधी?

276
BMC : महापालिकेत सहायक आयुक्तांच्या खांद्यावर अतिरिक्त कार्यभाराचा बोजा
  • सचिन धानजी, मुंबई 
मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असल्याने महापालिकेचा कारभार हा  नगरसेवकाविना चालविला जात आहे. त्यामुळे या प्रशासक नियुक्त कालावधीत विद्यमान आमदार आणि खासदार यांना महापालिकेच्या वतीने पालकमंत्र्यांच्या मंजुरीचे निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात ९०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून दिल्यानंतर आता चालू आर्थिक वर्षात ५४० कोटी ची तरतूद करून आमदार आणि खासदार यांना विकास निधी स्वरूपात हा निधी उपलब्ध करू दिला जात असल्याची माहिती मिळत आहे. (BMC Budget)
मुंबई महापालिकेत महापालिकेची मुदत ०७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आल्यानंतर मुंबई महापालिकेत प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून  मुंबईतील विकास कामे मंजूर करून घेत त्याची अंमलबजावणी करत आहे. महापालिकेत  नगरसेवक नियुक्त नसल्याने मुंबईचा विकास खुंटला जाण्याची शक्यता लक्षात घेत महापालिका प्रशासनाने  पालकमंत्र्यांच्या मंजुरीचे मुंबईतील आमदार, खासदार यांनी सुचवलेल्या कामासाठी  निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मागील आर्थिक वर्षात प्रत्येक आमदार आणि खासदार यांच्यासाठी प्रत्येकी ३५ कोटी रुपयांचा निधीची तरतूद केली होती. त्यासाठी एकूण ९०० कोटी रुपयांची तरतूद महापालिकेच्या अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार   मुंबईत निवडून आलेले आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य तसेच निवडून आलेले खासदार आणि राज्यसभा सदस्य यांच्यासाठी निधीची ही तरतुद केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांचा मंजुरीचे त्यांनी सुचवलेल्या कामांसाठी निधी खर्च करण्यात आला. (BMC Budget)
पण आता चालू आर्थिक वर्षातही आमदार आणि खासदार यांच्यासाठी निधीची तरतूद करून देण्याची मागणी मोठ्या स्वरूपात होत आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे पालकमंत्र्यांच्या मंजुरीने निधी वाटप करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील आणि खासदार यांना प्रत्येकी १५ कोटी रुपये एवढ्या निधीचीत तरतुद  विकास कामांसाठी करण्याच्या निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार एकूण ५४० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आमदार आणि खासदार यांना मुंबईतील विकास कामांसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. या मंजूर निधीतून आमदार आणि खासदार जी विकास कामे सूचवतील आणि त्यांना पालकमंत्री ही विकासकामे मंजूर करतील त्यानुसार हा निधी खर्च करण्यास मान्यता मिळणार आहे.  (BMC Budget)
मागील वर्षी प्रमाणेच  हा विकास निधी मिळावा  मागणी होत होती, परंतु आयुक्तांनी, मागील वर्षी प्रमाणे देता येणार नाही तर यंदा १५ कोटींची  तरतूद करावी अशा सूचना केल्याने जाता आमदारांना आता निवडणुकीपूर्वी किती  खर्च करता येतो याकडे लक्ष आहे. (BMC Budget)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.