Blinkit 10 Minute Return : ब्लिंकिटचं नवीन १० मिनिटात रिटर्न धोरण काय आहे?

Blinkit 10 Minute Return : सुरुवातीला कपडे आणि चपलेवर कंपनीने ही सेवा सुरू केली आहे. 

123
Blinkit 10 Minute Return : ब्लिंकिटचं नवीन १० मिनिटात रिटर्न धोरण काय आहे?
  • ऋजुता लुकतुके

ऑनलाईन खरेदी केलेली एखादी वस्तू तुम्हाला आवडली नाही तर तुम्ही ती ठराविक दिवसांत परत करू शकता, हा नियम तर तुम्हाला माहीतच आहे. ई-कॉमर्स उद्योगाचा तो अविभाज्य भाग आहे. हळूहळू किराणा सामानही ऑनलाईन सुरू झाला. ॲपवर ऑर्डर दिल्यावर १५ मिनिटांच्या आत सामान देण्याची चुरस या कंपन्यांमध्ये निर्माण झाली. ऑनलाईन ॲपमध्ये आता मोठी चुरस निर्माण झाली आहे. तिचा मुकाबला करण्यासाठी कंपन्या किराणा सामनाबरोबरच इतर ई-कॉमर्सवर मिळणाऱ्या फॅशनशी संबंधित वस्तूही आपल्या ॲपवर विक्रीसाठी उपलब्ध करत आहेत. स्पर्धा तर सगळीकडे आहेच. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपन्या शक्कलही लढवत आहेत. (Blinkit 10 Minute Return)

(हेही वाचा – Women’s T20 World Cup : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या दारुण पराभवाची ५ कारणं)

त्यातच आता ब्लिंकिट कंपनीने त्यांच्याकडून घेतलेले कपडे आणि चप्पल १० मिनिटांत परत करता येतील अशी योजना सुरू केली आहे. अनेकदा फॅशन क्षेत्रात कपडे आणि चपलांच्या साईझची समस्या मोठी असते. घेतलेले कपडे नंतर अंगावर बसत नाहीत. किंवा चप्पल होत नाही. अशावेळी अनेकदा ग्राहक एकाच कपड्याचे २ साईझ मागवतो. या योजनेत अशा ग्राहकांना न आवडलेले आणि न बसणारे कपडे झटपट परत करता येणार आहेत.

अगदी हीच गोष्ट ब्लिंकिटने सहसंस्थापक अलबिंदर धिंडसा यांनी आपल्या ट्विटर संदेशात अधोरेखित केली आहे. ‘आता ब्लिंकिटवर खरेदी केलेले कपडे आणि चपला तुम्ही दहा मिनिटांत परत देऊ शकाल. रिटर्न ऑर्डर ॲपवर दिसली की, १० मिनिटांच्या आत प्रतिनिधी येऊन तुमच्याकडून त्या वस्तू घेऊन जाईल. तुमचा परतावा तुम्हाला अधिक जलद मिळू शकेल,’ असं धिंडसा यांनी लिहिलं आहे. (Blinkit 10 Minute Return)

(हेही वाचा – राखीव खेळाडूंना ऑस्ट्रेलिया मध्ये घेऊन जाण्याचा विचार – Rohit Sharma)

ही सेवा सुरुवातीला दिल्ली इथं सुरू करण्यात आली होती. प्रायोगिक तत्त्वावर त्याची तपासणी झाल्यावर आता दिल्लीबरोबरच मुंबई, हैद्राबाद, बंगळुरू आणि पुण्यातही ती सुरू करण्यात आली आहे. १० ते १५ मिनिटांत किराणा सामान पोहचवणाऱ्या कंपन्यांना क्विक कॉमर्स म्हटलं जातं. या कंपन्यांमध्ये सध्या जोरदार चुरस आहे. झेप्टो, इन्स्टामार्ट अशा कंपन्या तर आहेतच. शिवाय ॲमेझॉन इसेन्सिअल्स, स्विगी मार्ट, बिगबास्केट अशा कंपन्याही आधीपासून या क्षेत्रात आहेत.

या स्पर्धेमुळेच क्विक कॉमर्स कंपन्या किराणा सामानाबरोबरच इलेक्टॉनिक्स, फॅशन असा वस्तूही आपल्या ॲपवर उपलब्ध करून देत आहेत. अशावेळी वस्तू परत देण्याच्या धोरणावर कंपन्यांनी लक्ष दिलं आहे. ब्लिंकिटची प्रतिस्पर्धी कंपनी झेप्टोने ७८ तासांत वस्तू बदली करून देण्याची हमी दिली आहे. (Blinkit 10 Minute Return)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.