लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर होणार मोठी कारवाई; काय म्हणाल्या Aditi Tatkare?

254
लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर होणार मोठी कारवाई; काय म्हणाल्या Aditi Tatkare?
लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर होणार मोठी कारवाई; काय म्हणाल्या Aditi Tatkare?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योनजेचा (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) तिसरा टप्प्यातील निधी हस्तांतरणास सूरूवात झाली आहे. यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. तर काहींच्या खात्यात ४५०० तर काहींच्या खात्यात ३५०० रूपये जमा झाले आहेत. दरम्यान या योजनेत गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकाराची (Chief Minister’s beloved sister scheme fraud) चौकशी होईपर्यंत संबंधित बँक अकाऊंट सील करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. 

नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्रचालकाने घोटाळा केल्याचं उघडं झालं. सचिन मल्टीसर्विसेस (Sachin Multiservices) नावाने गावातील सचिन थोरात हा युवक सुविधा केंद्र चालवतो. रोजगार हमी योजनेसाठी (Employment Guarantee Scheme) कागदपत्रं आवश्यक आहेत म्हणून त्याने ओळखीच्या पुरुषांचे आधार कार्ड बँक पासबुक जमा केले. मात्र अर्ज भरताना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. महिलांच्या आधार कार्डावर खाडाखोड करुन त्याने त्यावर पुरुषांचे आधार क्रमांक आणि बँक अकाऊंट नंबर टाकले आणि अर्ज भरले. अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित पुरुषांकडून त्यानं पैसे उकळले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित केंद्रचालक सचिन थोरात फरार झाला आहे.  लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकाराची चौकशी होईपर्यंत संबंधित बँक अकाऊंट सील करणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले. 

(हेही वाचा – LPG Gas Price Hike : व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्या)

अदिती तटकरे काय म्हणाल्या?

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रकरणासंदर्भात बोलताना माझे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून झालं आहे. जी ३०-३५ अकाऊंट्स आहेत त्यांच्या बँकांशी संपर्क साधून हे अकाऊंट फ्रीज करण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी म्हटलं. या अकाऊंट्समधे भविष्यात कुठल्याही प्रकारचे ट्रॅन्झॅक्शन होऊ नये याची दक्षता घेण्यात येईल. संबंधित आरोपी व्यक्तीचाही शोध सुरू आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या.

(हेही वाचा – १९९० पासून Konkan Railway चा विकास खुंटलेला; महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी)

जिल्हाधीकाऱ्यांना आदेश

लाडकी बहीण योजने (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) संदर्भात झालेल्या  फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथे सीएससी केंद्र चालकांने महिलांची माहिती भरुन, पुरुषांचे आधार क्रमांक नोंदवून त्याजागी पुरूषांचे आधार क्रमांक आणि बँक अकाऊंट नंबर टाकले. तब्बल ३३ अर्ज सीएससी चालकाने अशा पद्धतीने भरले होते. लाडकी बहीण योजनेचे पैसै त्यात्या पुरूषांच्या खात्यात जमा झाले. ते पैसै रोजगार हमी योजनेचे असल्याचे सांगून संबंधितांना केंद्र चालक सचिन थोरात याने आपल्या खात्यात पैसे वर्ग करायला लावले.   

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.