‘बेस्ट’ उपक्रमाने जाहीर केली गहाळ झालेल्या फोनची यादी

41

मोबाईल फोन ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची व गरजेची वस्तू झालेली आहे. आपला मोबाईल फोन आपल्या जवळ नसला की, प्रत्येकजण बैचेन होतो. परंतु अनेकदा घाईगडबडीत आपला फोन गहाळ होतो किंवा हरवतो अशावेळी मात्र शोधाशोध करत हतबल होऊन अनेकजण पोलीस स्टेशनला तक्रार करतात. तुमचा फोन जर बसमध्ये हरवला असेल तर बेस्ट उपक्रमाने ज्यांचे फोन फेब्रुवारी २०२३ या महिन्यात गहाळ झाले आहेत अशा सर्व नागरिकांना दिलासा दिला आहे.

( हेही वाचा : ‘आमच्याकडे गुजरातहून निरमा पावडर येते, ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो…’; भाजपा आमदाराचे खळबळजनक विधान )

ट्विटरवर यादी जाहीर

बेस्ट उपक्रमाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून गहाळ किंवा बसमध्ये हरवलेल्या मोबाईल फोनची यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये मोबाईल फोन हरवलेला दिनांक, बस क्रमांकाचा मार्ग, मोबाईल फोनचे नाव नमूद केलेले आहे. त्यामुळे ज्यांचे फोन हरवले आहेत त्यांनी तातडीने बेस्ट उपक्रमाशी संपर्क साधावा आणि हे मोबाईल फोन १५ एप्रिल २०२३ च्या आधी आपल्या ताब्यात घ्यावेत असे आवाहन उपक्रमामार्फत करण्यात आले आहे.

या संकेतस्थळावर उपलब्ध

गहाळ वस्तूंची अधिक माहिती बेस्ट उपक्रमाच्या bestundertaking.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असेही बेस्टने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.