Mumbai येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासंबंधी (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) तुम्ही वेगवेगळ्या घटना ऐकल्या असतील पण, मंगळवारी ०९ एप्रिलला सकाळी अकासा एअरच्या (Akasa Air) मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानावर (Delhi flight from Mumbai) मधमाशांनी हल्ला (Bee attack on plane) केला. यावेळी मधमाश्यांच्या एका मोठ्या थव्याने विमानावर हल्ला चढवला. यामुळे काही काळासाठी विमानसेवा विस्कळीत झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानतळावरील क्विक रिस्पॉन्स पथकाने तातडीने कारवाई करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. (Mumbai)
(हेही वाचा – Indian Navy ला मिळणार 26 राफेल मरीन जेट ; फ्रान्ससोबत 63 हजार कोटींच्या कराराला मंजुरी)
नेमकं काय घडलं?
अकासा एअरचे मुंबईहून दिल्लीला जाणारे विमान बे नंबर A1 वर थांबले होते. याच दरम्यान अचानक मोठ्या संख्येने मधमाश्या जमा होऊ लागल्या. काही क्षणातच संपूर्ण विमानाला मधमाश्यांनी वेढले. यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर विमानतळावरील क्वीक रिस्पॉन्स टीमला घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या टीमने सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर करून मधमाशांना विमानापासून हटवले. त्यांच्या या त्वरित प्रतिसादाने मोठा अनर्थ टळला.
या घटनेमुळे विमानाचे (airplanes) वेळापत्रक विस्कळीत झाले. मधमाश्यांचा हल्ल्यानंतर प्रशासनाने आवश्यक तपासणी केल्या. या तपासणीनंतर या विमानाला दिल्लीकडे प्रस्थान करण्याची परवानगी मिळाली. या घटनेत कोणतीही व्यक्ती जखमी झालेली नाही, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.
(हेही वाचा – Waqf Law 2013 ने धर्मांध मुस्लिम आणि भूमाफियांना बळकटी मिळाली; पंतप्रधान मोदींचा आरोप)
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा मधमाशांचा थवा कसा आणि कुठून आला, याबद्दल सखोल चौकशी सुरू केली आहे. हवामान बदल, विमानांचा गोंगाट किंवा प्रकाशातील बदलांमुळे या अशा घटना घडू शकतात का, याचाही अभ्यास केला जाणार आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community