Bangladesh : वीस वर्षांनी सापडले घुसखोर बांगलादेशी; शिवडीतून दोघांना अटक

170
वीस वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी करून मुंबईतील शिवडी येथे राहणाऱ्या दोन बांगलादेशीयांना (Bangladesh) शिवडी पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे मागील २० वर्षांपासून शिवडी परिसरात बेकायदेशीर राहण्यास होते. एक जण आयुर्वेदिक औषधाची विक्री करीत होता, तर दुसरा सुलभ शौचालयाचे कंत्राट घेऊन शौचालय चालवत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोघांविरुद्ध शिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद मेजानूर मुझफ्फर शाहजी (४०), नूरइस्लाम हसमतली दर्जी (४५) असे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशीयांची नावे आहेत. हे दोघे शिवडीतील फसबेरी रोड, इंदिरा नगर झोपडपट्टी येथे राहण्यास होता. मोहम्मद मेजानूर आणि नूरइस्लाम हे दोघे २० वर्षांपूर्वी बांग्लादेशातून (Bangladesh) भारतात घुसखोरी करून आले होते. शिवडी येथे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या या दोघांपैकी मोहम्मद मेजानूर हा आयुर्वेदिक औषधे विक्री करीत होता, तर नूरइस्लाम हा सुलभ शोचालायचे कंत्राट घेऊन शोचालाय चालवत होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
दोन बांगलादेशी शिवडी येथील इंदिरा नगरमध्ये राहत असल्याची माहिती शिवडी पोलिस ठाण्यातील एटीएस पथकाला मिळाली होती, या पथकाने खबऱ्यांच्या मार्फत माहिती मिळवून सोमवारी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी बांगलादेशी (Bangladesh) असल्याची कबुली दिली, त्यांच्याकडे पोलिसांनी भारतात आल्याचे कागदपत्रे मागितली असता त्यांच्याकडे भारतीय असल्याचे कुठलेही कागदपत्रे मिळून आली नाही. पोलिसांनी या प्रकरणी या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करू नये दोघाना अटक करण्यात आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.