bangladesh violence: बांगलादेशमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर; बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा फोडला

167
bangladesh violence: बांगलादेशमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर; बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा फोडला
bangladesh violence: बांगलादेशमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर; बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा फोडला

बांगलादेशमध्ये (bangladesh violence) गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनानंतर अखेर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Prime Minister Sheikh Hasina) यांनी राजीनामा दिला आहे. हसीना यांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची मुख्य मागणी होती. दरम्यान आरक्षणच्या मुद्द्यावरून देश पेटला असतानाच बांगलादेशमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. आंदोलकांनी बांगलादेशाच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावणारे ‘वंगबंधू शेख मुजीबूर रहमान’ (Bangabandhu Sheikh Mujibur Rahman) यांच्या पुतळ्याची मोडतोड केली आहे. संबंधित मोडतोडीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (bangladesh violence)

WhatsApp Image 2024 08 05 at 6.06.01 PM

आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटलेल्या आंदोलनादरम्यान बांगलादेशात आतापर्यंत शेकडो आंदोलकांचा मृत्यू  झाला आहे. तसेच आंदोलकांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. याचदरम्यान, काही आंदोलकांनी शेख हसिना यांचे वडील आणि बांगलादेशाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे शेख मुजीबूर रहमान यांच्या पुतळ्याला लक्ष्य केले. या आंदोलकांनी शेख मुजीबूर रहमान यांच्या पुतळ्यावर चढून त्यावर हातोडा चालवला. बांगलादेशमधील आंदोलनामध्ये रविवारी सुमारे १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.   

(हेही वाचा – अनिल देशमुखांचा मुलगा माझ्या पाया पडला होता; Parambir Singh यांचा दावा)

शांतता कायम ठेवण्याची लष्करप्रमुखांची मागणी

दरम्यान, बांगलादेशमध्ये घडत असलेल्या घडामोडीवर लष्करप्रमुखांनी (Bangladesh Army Chief) शांतता कायम ठेवण्याचा आवाहान केलं आहे. देशाला संबोधित करताना लष्करप्रमुख आंदोलकांना उद्देशून म्हणाले की, तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू. तोडफोडीपासून दूर राहा. तुम्ही आमच्यासोबत राहिलात तर आम्ही स्थितीमध्ये बदल करू. हिंसाचार, अराजकतेपासून दूर राहा. बांगलादेशमध्ये लष्कर अंतरिम सरकार स्थापन करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.    (bangladesh violence)

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.