Beautification : वांद्रे पश्चिम द्रुतगती मार्ग, माहिम कॉजवे जंक्शन सुशोभीकरण

504
Beautification : वांद्रे पश्चिम द्रुतगती मार्ग, माहिम कॉजवे जंक्शन सुशोभीकरण
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

महापालिकेच्या एच पश्चिम विभागातील वांद्रे येथील पश्चिम द्रुतगती मार्गावर तसेच माहिम कॉजवे येथील जंक्शनच्या पुलाखालील बाजूचे सुशोभीकरण (Beautification) आदींचे काम करण्यात आले आहे. या कामांसाठी तब्बल ९६ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी काढलेल्या निविदेची विधीग्राहयता संपल्यानंतरही त्याच कंत्राटदाराकडून घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा – Hasan Mushrif यांच्या पाठपुराव्याला यश; आठ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता)

महानगरपालिका आयुक्तांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना केलेल्या सादरीकरणाच्या अनुषंगाने सुशोभीकरण (Beautification) आणि नागरिकांना अधिक चांगल्या सेवा व सुविधा देण्यासाठी प्रभागातील प्रमुख ठिकाणे ओळखण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, रस्त्याच्या दुभाजकाचे सुशोभीकरण, स्टॅम्प कॉक्रिटीकरण करून फूटपाथचे सुशोभीकरण, विजेद्वारे पदमथाचे सुशोभीकरण यासारखी कामे, मोहक कुंड्यांचे आकर्षक डिझाईन, रस्त्यावरील सर्जनशील फर्निचरची तरतूद, पथदिव्यांद्वारे सुशोभीकरण, विजेद्वारे पुलांचे सुशोभीकरण, पुलाखालच्या जागेचा वापर, वाहतूक बेटाचे सुशोभीकरण, भिंत पेंटिंगची तरतूद विभाग स्तरावर केली आहे.

(हेही वाचा – Tulsi Lake मधील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवणार, २५ एमएलडीचे उभारणार नवा प्रकल्प)

एच/पश्चिम विभागामध्ये पूर्वेकडील बाजूस पश्चिम द्रुतगती मार्गावर तसेच माहिम कॉजवे येथील जंक्शनच्या पुलाखालील बाजूचे सुशोभिकरणाकरिता (Beautification) २४ मार्च २०२३ रोजी प्राप्त होतील अशा रितीने निविदा मागवल्या होत्या. यामध्ये जुन २०२३ मध्ये निविदा उघडण्यात आली. यात एम बी ब्रदर्स ही कंपनी पात्र ठरली होती, परंतु या कंपनीने पुढे काम करण्यास नकार दिल्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरील उर्जा डेव्हलपर्स आणि ब्युटीफिकेशन (Beautification) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला एम बी ब्रदर्सने लावलेल्या बोलीवर काम करण्यास भाग पाडले. त्यामुळे हे काम तीन महिन्यांमध्ये करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात हे काम उशिराने पूर्ण झाले. या कंपनीच्या निविदेची १० डिसेंबर २०२३ पर्यंत असताना प्रत्यक्षात हे काम उशिराने पूर्ण झाले आणि त्यानंतर याच्या कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव जून २०२४ मध्ये मंजूर करण्यात आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.