Bajaj Finance Share Price : बजाज फायनान्स शेअरच्या किमतीवर परिणाम करणारे ५ घटक

Bajaj Finance Share Price : बजाज फायनान्सची उपकंपनी हाऊसिंग फायनान्स आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.

147
Bajaj Finance Share Price : बजाज फायनान्स शेअरच्या किमतीवर परिणाम करणारे ५ घटक
  • ऋजुता लुकतुके

जेफरीज् सारख्या जागतिक दर्जाच्या संशोधन कंपनीने अलीकडेच बजाज फायनान्स कंपनीचं लक्ष्य कमी करून या शेअरला डाऊनग्रेड असा शेरा दिला आहे. त्यामुळे मागचे तीन दिवस मिळून या शेअरमध्ये जवळ जवळ ८ टक्क्यांची घसरण दिसून आली होती. पण, शुक्रवारी या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मात्र हा शेअर काहीसा सावरला आणि ६,५८५ वर बंद झाला. गुरुवारच्या तुलनेत या शेअरमध्ये १२७ अंशांची म्हणजे जवळ जवळ दोन टक्क्यांची वाढ दिसून आली.

कंपनीने अलीकडे जाहीर केलेल्या तिमाही आकड्यापासून संशोधन संस्था या शेअरबद्दल काहीशा सावध आहेत. आगामी एक महिना ते ३ महिन्याच्या काळासाठी विविध कंपन्यांनी दिलेले शेरे हे उदासीनतेचे आहेत. अशावेळी शेअरवर परिणाम करतील असे पाच घटक आणि संशोधन संस्थांचं या शेअरविषयीचं मत पाहूया, (Bajaj Finance Share Price)

(हेही वाचा – मुलुंडमध्ये BJP ला करावी लागणार खांदेपालट?)

New Project 9 3

१. बजाज हाऊसिंग फायनान्सचा प्रस्तावित आयपोओ

शुक्रवारी बजाज फायनान्स कंपनीच्या शेअरमध्ये दिसून आलेली तेजी ही बहुतांशी उपकंपनी बजाज हाऊसिंग फायनान्सच्या प्रस्तावित आयपीओमुळेच होती. गेल्या महिन्यात सेबीने हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओला परवानगी दिली आहे. या आयपीओचा आकार जवळ जवळ ५३,००० ते ५६,००० कोटी रुपयांचा असेल असा अंदाज आहे. सप्टेंबर महिन्यातच कंपनीला आयपीओ बाजारात आणायचा आहे. दुसरं म्हणजे बजाज कंपनीचा हा आयपीओ अनेक वर्षांनी येतोय. त्यामुळे याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. जसजशी या आयपीओविषयी माहिती गुंतवणूकदारांना कळेल, बजाज फायनान्स या मुख्य कंपनीच्या शेअरबद्दलची उत्सुकताही वाढत जाईल. (Bajaj Finance Share Price)

२. बजाज फायनान्स कंपनी सध्या आपल्या उद्योगाच्या विस्ताराकरीता परदेशातून कर्ज उचलण्याच्या तयारीत आहे. रिझर्व्ह बँकेच्या अतिरिक्त व्यावसायिक कर्ज या सुविधेअंतर्गत परदेशातून ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकं कर्ज कंपनीला हवं आहे. आणि सरकारी यंत्रणेच्या मार्फत ते मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

(हेही वाचा – ‘महाभारत’ धर्मग्रंथाचे अश्लाघ्य विडंबन असलेल्या ‘संगीत वस्त्रहरण’ नाटकावर बंदी आणा; Hindu Janjagruti Samiti ची मागणी)

३. अलीकडेच कंपनीने आपला एप्रिल ते जून तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. यात बाकीचे आकडे समाधानकारक असले तरी कर्ज वसुलीत ही बँकेतर वित्तीय संस्था कमी पडलेली दिसते. ज्या कर्जाची वसुली होत नाहीए असा कर्जासाठी बाजूला काढून ठेवलेली रक्कम या तिमाहीत १५० कोटी रुपयांनी कमी पडली आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअरवर दिसून येत आहे.

४. बजाज फायनान्स कंपनीवर गेल्याच आठवड्यात ३४१ कोटी रुपयांचा जीएसटी थकवल्या प्रकरणी सरकारने नोटीस बजावली आहे. ज्या सेवांवर जीएसटी लागत नाही अशा सेवांमधील व्यवहार दाखवून प्रत्यक्षात इतर सेवांमध्ये व्यवहार केल्याचा संशय प्रशासनाला आहे. याप्रकरणी कंपनीकडून उत्तर मागवण्यात आलं आहे.

५. तीन आठवड्यांपूर्वी कंपनीचे आलेले तिमाही आकडे निराशाजनक होते. त्यामुळे देशातील आणि परदेशातील ब्रोकरेज फर्म आणि संशोधन संस्थांनी बजाज फायनान्सविषयीचे तिमाही अंदाज हे सावधगिरीने दिले आहेत. मोतीलाल ओस्वाल या भारतीय कंपनीने या शेअरवर न्यूट्रल रेटिंग दिलं आहे. जेफरीज् ने खरेदी करण्याचा सल्ला दिला असला तरी ९,२०० वरून लक्ष्य अगदी ७,९०० पर्यंत खाली आणलं आहे. सिटी ग्रुपनेही लक्ष्य ८,२३० पर्यंत खाली आणलं आहे. (Bajaj Finance Share Price)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.