Bagmati Express मालगाडीला धडकली, अनेक जण जखमी

266
Bagmati Express मालगाडीला धडकली, अनेक जण जखमी
Bagmati Express मालगाडीला धडकली, अनेक जण जखमी

म्हैसूरहून दरभंगाकडे जाणारी बागमती एक्सप्रेस (Bagmati Express) तामिळनाडूतील कावरपेट्टई स्टेशनजवळ मालगाडीला धडकली. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी आग लागली आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिलेली आहे. मात्र जखमींची संख्या अद्याप कळू शकलेली नाही. दरम्यान जखमींना तत्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

(हेही वाचा : Shikhar Savarkar Puraskar : उदयोन्मुख गिर्यारोहक इंद्रनील खुरंगळे यांचा ‘युवा साहस पुरस्कारा’ने गौरव

या अपघातात एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले असून त्यांना आग लागली आहे. दि. ११ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजाता हा अपघात घडला. त्यावेळी ट्रेनमधील (Bagmati Express) प्रवाशांमध्ये घबराट पसरली. त्यानंतर घटनास्थळी संबंधित अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक टीम पाठवली आहे. अपघातामुळे रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. (Bagmati Express)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.