Badlapur School Case : अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन; खोडसाळपणा करणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल

149
Badlapur School Case : अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन; खोडसाळपणा करणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल
Badlapur School Case : अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन; खोडसाळपणा करणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाबाबत चुकीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीवर अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले. (Badlapur School Case) रितिका प्रकाश शेलार (Ritika Prakash Shelar) असे या तरुणीचे नाव आहे. अंबरनाथ येथे राहणाऱ्या या तरुणीचे इन्स्टाग्रामवर ५ लाख ५० हजार फॉलोअर्स आहेत. रितीकाने  तिच्या इन्स्टाग्रामवर बदलापूर लैगिंक अत्याचार प्रकरणाबाबत अफवा पसरवली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रितिका शेलार या तरुणीने बदलापूर आंदोलनानंतर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल  केला होता. या मेसेजमध्ये पीडितांपैकी एकाचा मृत्यू झाला होता आणि एका आईने आत्महत्या केली असल्याचे म्हटले होते.

रितिका शेलारने हा मेसेज तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट केला होता. इन्स्टाग्रामवर रितिकाचे साडेपाच लाख फॉलोअर्स आहेत, तिच्या या चुकीच्या मेसेजमुळे संपूर्ण बदलापूर आणि अंबरनाथमध्ये खळबळ उडवून दिली होती.  एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “त्या तरुणीने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर हे स्टेटस ठेवले होते, तिचे साडे पाच फॉलोअर्स असल्याने ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आणि लोकांमध्ये अफवा पसरली.”

पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेत ठाणे सायबर पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. “तांत्रिक तपास केल्यानंतर रितिका हिने सोशल मीडियावर अफवा पसरवल्याचे निष्पन्न झाले. तो मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होऊन समाजात चुकीचा संदेश पसरला. रितिकाला अंबरनाथ येथून ताब्यात घेण्यात आले असून तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे,” एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

जनतेने अफवा पसरवू नये किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Badlapur School Case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.