Badlapur येथे संतप्त पालक उतरले रेल्वे रूळावर; जोरदार घोषणाबाजी करत लोकल वाहतूक रोखली

254
Badlapur येथे संतप्त पालक उतरले रेल्वे रूळावर; जोरदार घोषणाबाजी करत लोकल वाहतूक रोखली
Badlapur येथे संतप्त पालक उतरले रेल्वे रूळावर; जोरदार घोषणाबाजी करत लोकल वाहतूक रोखली

मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या बदलापूरमधील (Badlapur) एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार, २० ऑगस्ट रोजी बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शाळेसमोर हजारोंच्या संख्येने पालक, राजकीय मंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेसमोर आंदोलन सुरु आहे.

(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा आयपॅड कुठेही विसरतो. पण, ‘ही’ गोष्ट सामन्यापूर्वी विसरत नाही!)

बुधवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे. मात्र, तीन तास उलटूनही शाळा प्रशासनाकडून नागरिकांशी चर्चा करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद राहिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अनेक तास उलटूनही मुलींच्या पालकांची तक्रार दाखल करुन घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. शाळा आणि पोलीस प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने पालकांचा जमाव संतप्त झाला आहे.

नागरिकांमध्ये संतापाची लाट, लोकल ट्रेन रोखल्या

हे प्रकरण समोर आल्यानंतर आता नागरिक प्रचंड संतापले आहेत. ज्या शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाले, त्या शाळेच्या बाहेर महिला, तसेच पुरुष मोठ्या संख्येने जमले आहेत. नागरिक येथे घोषणाबाजी करत आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. सात दिवस झाले तरी या प्रकरणावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे देखील नागरिक प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आहेत. लोक बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवर जमले असून त्यांनी लोकल ट्रेन रोखल्या आहेत. रेल्वे ट्रॅकवर उतरून नागरिक जोरदार घोषणाबाजी करत आहेत. पोलीस आंदोलकांना रेल्वे रूळावरून हटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

तक्रारीसाठी १२ तास वाट पहावी लागली

बदलापूर शहरातील एका जुन्या आणि नामांकित शाळेत हा संतापजनक प्रकार घडला होता. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आले होते. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) हस्तक्षेपानंतर रात्री एक वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यावरून पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच बदलापूर पोलीस ठाण्यात २ नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.