Assembly Election : राज्यातील पोलिसांच्या रजा रद्द

234
Assembly Election : राज्यातील पोलिसांच्या रजा रद्द
  • प्रतिनिधी

राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्‍वभूमीवर मुंबईसह राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या सर्व पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयाने मंगळवारी एक परिपत्रक जारी करत हे आदेश दिले आहेत. रद्द रजांमधून वैद्यकीय रजा आणि अत्यावश्यक कारणांसाठीच्या रजा वगळण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – Transgender Voters : पाच वर्षांत तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुपटीने वाढ!)

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) तारीख घोषित केल्यानंतर मंगळवारपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ही सर्व निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी. कुठेही अनुचित घटना घडू नये म्हणून सतर्क राहण्याचे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयातून जारी करण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Congress ने लोकसभा निवडणुकीत लाच म्हणून वापरला सरकारी निधी; ईडीच्या चार्जशीटमध्ये खुलासा)

कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी निवडणुक प्रक्रियेसाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक पार पडेपर्यंत पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना अत्यावश्यक कारणाशिवाय किंवा वैद्यकीय रजा वगळून अन्य कोणत्याही कारणाशिवाय सुट्टी घेता येणार नाही. तसेच, साप्ताहिक सुट्ट्यांसह पोलिसांच्या रजा बंद करण्यात आल्या आहेत. राज्य पोलीस दलातील विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) आणि राज्य पोलीस समन्वय अधिकारी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे डॉ. छेरिंग दोरजे यांनी संबंधित आदेश जारी केले आहेत. (Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.