Assembly Election 2024 : मुंबईत वाढला महिलांच्या मतदानाचा टक्का

131
Assembly Election 2024 : मुंबईत वाढला महिलांच्या मतदानाचा टक्का
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबईत झालेल्या मतदानामध्ये महिलांनी अधिक बाजी मारल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील दोन्ही जिल्ह्यांमधील ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला मतदानासाठी रस्त्यावर उतरल्या असून एवढ्या मोठ्याप्रमाणात महिलांनी मतदान करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि महिलांसाठी राबवलेल्या योजनांमुळे यंदाच्या निवडणुकीतील मतदानात महिलांनी हिरीरीने भाग घेतल्याचे दिसून येत आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Ration Card : मोदी सरकारने 6 कोटी शिधापत्रिका केल्या रद्द; तुमचेही नाव यादीत आहे का?)

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सरासरी एकूण ५२.६९ टक्के मतदान झाले तर उपनगरांमध्ये सरासरी एकूण ५६.३९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. शहर जिल्ह्यात एकूण २५ लाख ४१ हजार ८१० मतदार असून त्यात १३ लाख ३९ हजार २९९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. यामध्ये ७ लाख १० हजार १७४ पुरुष मतदार आणि, ६ लाख २९ हजार ०४९ महिला मतदारांनी तसेच इतर ७६ मतदारांनी मतदान केलेले आहे. मतदानाची एकूण सरासरी ५२.६९ टक्के आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – नवी मुंबई येथील विमानतळाजवळील बेकायदेशीर दर्गा जमीनदोस्त; Hindu Janajagruti Samiti च्या लढ्याला यश)

उपनगर जिल्ह्यात एकूण ७६ लाख ८६ हजार ०९८ मतदार असून त्यात ४३ लाख ३४ हजार ५१३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. यामध्ये २३ लाख ०० हजार ५८९ पुरुष मतदार आणि, २० लाख ३३ हजार ६५४ महिला मतदारांनी तसेच इतर २७० मतदारांनी मतदान केलेले आहे. त्यामुळे सर्व ३६ मतदारसंघांमध्ये महिला मतदारांनी केलेल्या मतदानाचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जवळपास दिसून आले आहे. आजवर महिला मतदारांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत फारच कमी दिसून येत होते, परंतु आता हे प्रमाण यंदाच्या निवडणुकीत पुरुष मतदारांच्या तुलनेत त्यांच्या आसपास दिसून आले. प्रत्येक निवडणुकीत पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या ही पाच ते सहा टक्क्यांनी कमी असते, परंतु यंदाच्या तुलनेत महिला मतदारांच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येत आहे. प्रत्यक्षात महिला मतदारांची संख्या कमी असली तरी महिला मतदारांच्या संख्येच्या तुलनेत ही टक्केवारी अधिक दिसून आलेली आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Rafael Nadal : राफेल नदालचे व्यावसायिक कमाईचे विक्रम; ‘ही’ आहे बक्षिसांची आयुष्यभराची कमाई)

पुढील विधानसभा मतदारसंघात महिला आणि पुरुष मतदारांनी केलेले मतदान : 

धारावी विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ३१ हजार ०२० पैंकी पुरुष मतदार ७१ हजार १७६, स्त्री मतदार ५९ हजार ८३२ तर इतर १२

सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ५१ हजार ७११ पैंकी पुरुष मतदार ८२ हजार ३८३, स्त्री मतदार ६९ हजार ३१४

वडाळा विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख १८ हजार ४४५ पैंकी पुरुष मतदार ६१ हजार ३९६, स्त्री मतदार लाख ५७ हजार ०४८ तर इतर १

माहीम विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ३३ हजार ३४३ पैंकी पुरुष मतदार ६७ हजार ३५२, स्त्री मतदार ६५ हजार ९६४

वरळी विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ४१ हजार ५८५ पैंकी पुरुष मतदार ७५ हजार ६९९, स्त्री मतदार ६५ हजार ८८२

शिवडी विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ५२ हजार ८८० पैंकी पुरुष मतदार ८० हजार ८४८, स्त्री मतदार ७२ हजार ०२८

भायखळा विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ३७ हजार २४४ पैंकी पुरुष मतदार ७२ हजार ५७६, स्त्री मतदार ६४ हजार ६६५

मलबार हिल विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ३७ हजार १९५ पैंकी पुरुष मतदार ७१ हजार ३४९, स्त्री मतदार ६५ हजार ८४४

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख १७ हजार ९८६ पैंकी पुरुष मतदार ६३ हजार ५६८, स्त्री मतदार ५४ हजार ४१४

कुलाबा विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख १७ हजार ८९०पैंकी पुरुष मतदार ६३ हजार ८२७, स्त्री मतदार ५४ हजार ०५८

बोरीवली विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान २ लाख ०२हजार ९८५पैंकी पुरुष मतदार ०१ लाख ०४ हजार ३५१, स्त्री मतदार ९८ हजार ६३३

दहिसर विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान २ लाख ७७ हजार ९१५ पैंकी पुरुष मतदार ०१ लाख ४७ हजार ४९७, स्त्री मतदार १ लाख ३० हजार ३९९

मागाठाणे विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ८० हजार ८०९ पैंकी पुरुष मतदार ९६ हजार ८४०, स्त्री मतदार ८३ हजार ९६८

मुलूंड विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ८२ हजार २३८ पैंकी पुरुष मतदार ९३ हजार ९७१, स्त्री मतदार ८८ हजार २५३

विक्रोळी विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १लाख ४० हजार २९५ पैंकी पुरुष मतदार ७३हजार ९५७, स्त्री मतदार ६६ हजार ३३७

भांडुप विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ८१ हजार २७९ पैंकी पुरुष मतदार ९८ हजार १९६, स्त्री मतदार ८३ हजार ०७१

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ७६ हजार ८९० पैंकी पुरुष मतदार ९३ हजार १२२, स्त्री मतदार ८३ हजार ७६१

दिंडोशी विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ७७ हजार ००९ पैंकी पुरुष मतदार ९८ हजार ७८९, स्त्री मतदार ७८ हजार २०८

कांदिवली विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ५७हजार १३४ पैंकी पुरुष मतदार ८५ हजार ५३१, स्त्री मतदार ७१ हजार ६०१

चारकोप विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ८३ हजार ३३७ पैंकी पुरुष मतदार ९८ हजार ५९७, स्त्री मतदार ८४ हजार ७३३

मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ९६हजार ४६५ पैंकी पुरुष मतदार १ लाख ०२ हजार ७४१, स्त्री मतदार ९३ हजार ६६२

गोरेगाव विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ८३ हजार ०७२ पैंकी पुरुष मतदार ९८ हजार २५६, स्त्री मतदार ८४ हजार ८१३

वर्सोवा विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ४७ हजार ४८७ पैंकी पुरुष मतदार ७८ हजार ७९०, स्त्री मतदार ६८ हजार ६९७

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ५४ हजार ६३६ पैंकी पुरुष मतदार ७९ हजार ६९२, स्त्री मतदार ७४हजार ९४२

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ६७ हजार ९२१ पैंकी पुरुष मतदार ८९ हजार २६९, स्त्री मतदार ७८ हजार ५६२

विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ५६ हजार ८६५ पैंकी पुरुष मतदार १८ हजार १६१, स्त्री मतदार ७५हजार ७०४

चांदिवली विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान २ लाख ३९ हजार ७३९ पैंकी पुरुष मतदार १ लाख ३१ हजार २०२, स्त्री मतदार १ लाख ०८ हजार ५३२

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ६६ हजार ४९९ पैंकी पुरुष मतदार ८८ हजार ७५५, स्त्री मतदार ७७ हजार ६९८

घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ४८ हजार ६८३ पैंकी पुरुष मतदार ७७ हजार ५८६, स्त्री मतदार ७१ हजार ०८६

मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ७४ हजार २११ पैंकी पुरुष मतदार ९५ हजार ४४७, स्त्री मतदार ७१ हजार ०८६

अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ४५ हजार ४०६ पैंकी पुरुष मतदार ७५ हजार ६५६, स्त्री मतदार ६९ हजार ७२७

चेंबूर विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ४२ हजार ३३८ पैंकी पुरुष मतदार ७३ हजार ७५६, स्त्री मतदार ६८ हजार ३६

कुर्ला विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ५५ हजार ३१९ पैंकी पुरुष मतदार ८२ हजार ९४८, स्त्री मतदार ७२ हजार ३६५

कलिना विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख २७ हजार ३५६ पैंकी पुरुष मतदार ६७ हजार ७२३, स्त्री मतदार ५९ हजार ६२३

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ३६हजार १३१ पैंकी पुरुष मतदार ७२ हजार ६९१, स्त्री मतदार ६३ हजार ४३२

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ : एकूण झालेले मतदान १ लाख ४८ हजार ३०४ पैंकी पुरुष मतदार ७५ हजार ७४९, स्त्री मतदार ७२ हजार ५५२

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.