Donald Trump यांच्या हत्येचा पुन्हा प्रयत्न; गोल्फ क्लबच्या बाहेर गोळीबार

120
Donald Trump यांच्या हत्येचा पुन्हा प्रयत्न; गोल्फ क्लबच्या बाहेर गोळीबार
Donald Trump यांच्या हत्येचा पुन्हा प्रयत्न; गोल्फ क्लबच्या बाहेर गोळीबार

फ्लोरिडा (Florida) येथील पाम बीचवर ट्रम्प गोल्फ क्लबच्या बाहेर रविवार, 15 सप्टेंबर रोजी गोळीबार झाला. या वेळी अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) क्लबमध्ये गोल्फ खेळत होते. ट्रम्प सुरक्षित आहेत, असे सांगितले गेले आहे; मात्र या घटनेनंतर ट्रम्प गोल्फ कोर्सच्या आसपास एफबीआय आणि सीक्रेट सर्व्हिंस आढावा घेत आहेत. घटनेचा तपास एफबीआयकडे सोपवण्यात आला आहे. हा हल्ला म्हणजे पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे सांगितले जात आहे. आक्रमणकर्ते ट्रम्प यांच्यापासून ३००-५०० मीटर अंतरावर होते.

(हेही वाचा – Thuk Jihad : आरोग्याशी खेळणारा धर्मांधांचा विकृत ‘थूक जिहाद!’)

ही घटना रात्री २ च्या सुमारास घडली. माजी राष्ट्रपती यांच्यावर गोळीबार झाला कि नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ट्रम्प हे सुरक्षित आहेत. आम्ही या घटनेचा तपास करत आहोत, अशी माहिती गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिली. गोल्फमधील झाडांमध्ये एक एके ४७ आणि संशयिताला पकडण्यात आले आहे, असे ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरने म्हटले आहे.

वॉश्गिंटन पोस्टनेही याचे वृत्त प्रकाशित केले आहे. त्यानुसार, जेव्हा ही घटना घडली, तेव्हा ट्रम्प क्लबमध्ये गोल्फ खेळत होते. गोळीबार सुरु होताच सीक्रेट सर्व्हिंस जवानांकडून डोनाल्ड ट्रम्प यांना क्लबच्या एका होल्डिंग रुममध्ये नेण्यात आले. या गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना ईमेल पाठवला आहे. ‘मी कधीही सरेंडर करणार नाही. माझ्या आसपास गोळीबार झाली; परंतु अफवांवर विश्वास ठेवू नका. मी सुरक्षित आणि ठीक आहे. कुणीही मला रोखू शकत नाही. मी कधीही सरेंडर करणार नाही’, असे ट्रम्प यांनी त्यात म्हटले आहे.

अमेरिकेत हिंसेसाठी जागा नाही – कमला हॅरिस

फ्लोरिडात माजी राष्ट्रपती ट्रम्प आणि त्यांच्या मालमत्तेजवळ गोळीबाराची घटना मला ऐकण्यात आली. ट्रम्प सुरक्षित असल्याचे ऐकून मला बरे वाटले. अमेरिकेत (America) हिंसेसाठी कुठलीही जागा नाही, असे ट्वीट अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.