जोपर्यंत आमचे सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहणार; DCM Devendra Fadnavis यांची ग्वाही

93
जोपर्यंत आमचे सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहणार; DCM Devendra Fadnavis यांची ग्वाही

जो पर्यंत महायुतीचे सरकार आहे, तोपर्यंत ‘लाडकी बहीण योजना’ कोणीही बंद करू शकणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी एक्स समाज माध्यमावर पोस्ट करत म्हटले आहे की, मुंबई भाजपा आयोजित ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ या कार्यक्रमात सहभागी झालो. यावेळी ‘लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ’ या गाण्याचा शुभारंभ केला व संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून व्हीसीद्वारे जोडलेल्या लाडक्या बहिणींशी संवाद साधला. यादरम्यान बहिणींनी केलेल्या प्रेमाच्या वर्षावाने मन भारावून गेले.

अनेकजण मला देवेंद्र, देवेन अशा वेगवेगळ्या नावाने बोलावतात. परंतु माझ्या बहिणींनी ‘देवाभाऊ’ अशी घातलेली साद मला जास्त आवडते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पनेतील विकसित भारताच्या निर्मितीकरीता महिलांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना (वार्षिक ३ मोफत सिलेंडर), महिला सन्मान योजना (अर्ध्या तिकिटात महिलांना प्रवासाची सोय), मुलींकरीता मोफत उच्च शिक्षण योजना यांसारख्या अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत.

(हेही वाचा – माजी पोलीस आयुक्त Sanjay Pandey निवडणुकीच्या मैदानात, थेट केली उमेदवारांची घोषणा)

लाडक्या बहिणींना फडणवीसांनी दिली ‘ही’ ग्वाही 

रक्षाबंधनाच्या आधीच महाराष्ट्रातील १ कोटींपेक्षा जास्त बहिणींच्या खात्यात ओवाळणी म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ३००० रुपये जमा झाले आहेत. ‘आपले सरकार हे लेना बँक सरकार नसून देना बँक सरकार आहे. जोपर्यंत महायुतीचे सरकार आहे, तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही’. त्यामुळे लाडक्या बहिणींनी सावत्र भावांच्या दिशाभूल करणाऱ्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये.

महाविकास आघाडीतील नेत्यांचे ‘लाडका मुलगा व लाडकी मुलगी’ असे ब्रीदवाक्य आहे. त्यांच्याकडे केवळ या दोनच योजना चालतात. मात्र राज्यातील महायुतीचे सरकार महाराष्ट्राला सक्षम करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहे. विरोधकांचे तोंड हे रावणासारखे आहे. रावण जसा १० तोंडांनी खोटे बोलायचा अगदी त्याचप्रमाणे विरोधक सुद्धा १० तोंडांनी खोटे बोलत आहेत. परंतु आपण प्रभू श्री राम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारे लोक आहोत. त्यामुळे रयतेची सेवा करणे हाच आपला धर्म आहे आणि तो आपण निभावण्याचे काम करत आहोत. आज लाडक्या बहिणींनी बांधलेले राखीरुपी कवच घेऊन पुन्हा मैदानात उतरीन आणि वेगवेगळ्या नवीन योजना घेऊन येईन, अशी ग्वाही फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी यावेळी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.