मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नाकासमोरच Shivaji Park ला केले जाते विद्रुप

1443
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नाकासमोरच Shivaji Park ला केले जाते विद्रुप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्कच्या (Shivaji Park) समस्या आणि सुशोभीकरण आदींबाबत प्रचंड संवेदनशील असतात. परंतु राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थासमोरच या शिवाजी पार्कला विद्रुप करण्याचे काम मागील काही महिन्यांपासून होत आहे. या मैदानात क्रिकेट खेळणाऱ्यांचे चेंडू कट्ट्यावर बसणाऱ्या अथवा फिरणाऱ्या नागरिकांना लागू नये म्हणून सुरक्षा जाळी बसवण्यात आली आहे. परंतु चेंडू बचावासाठी लावलेल्या या जाळीचा उपयोगच पक्षाचे पदाधिकारी बॅनर व फलक लावण्यासाठी करत असून या जाळीवर लावण्यात येणाऱ्या फलकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचा (Shivaji Park) परिसर विद्रुप होत आहे. आणि नेमका हा प्रकार राज ठाकरे यांच्या डोळ्यांदेखत होत असताना त्यांना हे मान्य आहे का असा सवाल शिवाजी पार्क करांच्या मनात उपस्थित होऊ लागला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील (Shivaji Park) केळुस्कर मार्गाच्या दिशेला आणि श्री समर्थ व्यायाम शाळा ते शिवाजी पार्क जिमखाना आदी परिसरात मैदानातील आदी परिसरात क्रिकेटचा चेंडू बाहेरुन जाणाऱ्या अथवा कट्ट्यावर बसणाऱ्या नागरिकांना अथवा पादचाऱ्याला लागू नये म्हणून सुरक्षा जाळी बसवण्यात आली आहे. ही सुरक्षा जाळी बसवण्यात आल्याने क्रिकेटच संघ खुश असून त्यांच्या हातून सुटणारा चेंडून मैदानाबाहेर जात नाही. तसेच बाहेरुन फिरणारे नागरिकही आता बिनधास्तपणे चालत तसेच कट्ट्यावर बिनधास्तपणे बसत आहे. यापूर्वी सुरक्षा जाळी नसल्याने अनेकांच्या डोक्याला, अंगाला चेंडू लागून त्यांना किरकोळ दुखापत होण्याचे प्रकार होत होते, जे आता बऱ्याच प्रमाणात थांबल्याने विशेषत: ज्येष्ठ नागरिकांकडून याबाबत समाधान व्यक्त केले जाते.

(हेही वाचा – मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करा; CM Eknath Shinde यांचे निर्देश)

मात्र, चेंडूपासून बचाव करण्यासाठी लावलेल्या या जाळीचा राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून गैरफायदा घेत हा परिसर विद्रुप करण्याचा प्रयत्न करत आहेत. या जाळीवर आता सरसकट सर्वच राजकीय पक्षांचे बॅनर व फलक हे वाढदिवस, वर्धापन दिन आदींच्या शुभेच्छा देण्यासाठी लावले जात असून संपूर्ण जाळीच या राजकीय फलकांनी भरुन जात आहे. पण फलकांच्या गर्दी आतील परिसरात चालणाऱ्या क्रिकेट खेळाचा आस्वादही कट्ट्यावर बसून नागरिकांना घेता येत नाही. हे फलक लावण्यात पहिला क्रमांक हा मनसेचा असून त्यानंतर शिवसेना, उबाठा आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शिवतीर्थ हे निवासस्थान समोरच असल्याने मनसेचे पदाधिकारी हे आवर्जून या जागेवर फलक लावत आहेत, जेणेकरून साहेबांनी आपण लावलेला फलक वाचाव, साहेबांना आपले नाव कळावे. परंतु मनसेने प्रारंभ केल्यापासून आता अन्य पक्षाचे पदाधिकारीही याठिकाणी बॅनर व फलक लावत असून त्यामुळे ही जाळी आता राजकीय पक्षांच्या बॅनर व फलकांसाठीचे प्रमुख ठिकाण बनले आहे. या वाढत्या फलकांमुळे आता स्थानिक शिवाजी पार्कमधील जनतेला हे मान्य नसून ज्या राजकीय फलकांमुळे मुंबईला विद्रुप केले जाते, तेच फलक आता शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसराला विद्रुप करत आहे, मग हे राज ठाकरे यांना खटकत नाही का सवाल जनतेकडूनच केला जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.