iPhone 15 India Connection : आयफोन १५ च्या डिझायनिंगशी भारताचा खरंच जवळचा संबंध आहे?

ॲपलसारख्या मोठ्या आणि आधाडीच्या ब्रँडला चीन नंतर आता भारतीय बाजारपेठ खुणावत असल्याचं हे लक्षण आहे.

38
iPhone 15 India Connection : आयफोन १५ च्या डिझायनिंगशी भारताचा खरंच जवळचा संबंध आहे?
iPhone 15 India Connection : आयफोन १५ च्या डिझायनिंगशी भारताचा खरंच जवळचा संबंध आहे?
  • ऋजुता लुकतुके

ॲपलची बहुचर्चित आयफोन १५ सीरिज लाँच झाली आहे. आणि नव्या आयफोन १५ चं एक भारतीय कनेक्शन केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी उघड केलं आहे. काय आहे हे भारतीय कनेक्शन? ॲपल कंपनीने आपली आयफोन १५ सीरिज लाँच केल्यानंतर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी नवीन आयफोन भारतासाठी दोन बाबतीत महत्त्वाचा असल्याचं म्हटलंय. एक म्हणजे यावेळी पहिल्यांदाच आयफोन न्यूयॉर्क आणि भारतात एकाच वेळी उपलब्ध होणार आहे. यापूर्वी न्यूयॉर्क आणि दुबई, चीन सारख्या काही आघाडीच्या बाजारपेठांमध्ये तो पहिल्या दिवशी उपलब्ध व्हायचा. पण, आता २२ सप्टेंबरला जेव्हा आयफोन १५ ची चार मॉडेल बाजारात येतील, तेव्हा ती अमेरिका आणि भारतात एकाच वेळी उपलब्ध होतील. ॲपलसारख्या मोठ्या आणि आघाडीच्या ब्रँडला चीन नंतर आता भारतीय बाजारपेठ खुणावत असल्याचं हे लक्षण आहे.

ही भारतासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयफोन १५ मध्ये असलेली सॅटलाईट प्रणाली म्हणजे उपग्रह तंत्रज्ञान हे इस्त्रो अर्थात, भारतीय अंतराळ संशोधन विकास संस्थेचं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय उद्योजकता आणि तंत्रज्ञान विकास खात्याचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणतात, ‘आयफोन १५ च्या अनावरणाच्या निमित्ताने भारतानेही दोन महत्त्वाचे मापदंड पार केले आहेत. एकतर न्यूयॉर्क आणि भारतात आयफोन १५ एकाच वेळी लाँच झाला. बाजारपेठ म्हणून भारताचं स्थान यातून अधोरेखित झालं. आणि दुसरं म्हणजे पहिल्यांदा मोबाईलच्या जीपीएस प्रणालीसाठी इस्त्रोची NAVic ही प्रणाली वापरली गेली आहे. उपग्रह दळणवळण क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली आहे.’

आयफोन १५ मधील जीपीएस प्रणाली ही जास्त अचूक असल्याचा कंपनीचा दावा आहे. त्यासाठी त्यांनी इस्त्रोने विकसित केलेली ‘नेव्हिगेशन विथ इंडियन कन्स्टेलेशन (NavIC) ही प्रणाली वापरली आहे. मोबाईलच्या जीपीएस क्षेत्रात या निमित्ताने भारताने शिरकाव केला आहे. राजीव चंद्रशेखर यांनी आणखी एका ट्विटर थ्रेडमध्ये भारतात बनलेली जीपीएस प्रणाली चारचाकी गाड्यांमध्येही वापरली जाणार असल्याचा उल्लेख केला आहे.

(हेही वाचा – Birth Certificate : केवळ जन्म दाखल्याच्या आधारे मिळणार सर्व दाखले; १ ऑक्टोबरपासून नियम लागू
आयफोन १५

आयफोन १५ ची मॅक्स आणि प्रो मॉडेल २२ सप्टेंबरला बाजारात येतील. पण, त्यांचं प्री-बुकिंग सुरू झालं आहे. नवीन आयफोनमध्ये नेहमीच्या स्टेनलेस स्टील फ्रेम ऐवजी टिटॅनियम फ्रेम वापरण्यात आली आहे. त्यामुळे चमकदार लुकबरोबरच फोनचं वजनही काहीसं कमी झालं आहे.

तर आयफोनचा डिस्प्ले ६.१ आणि ६.७ इंचांचा आहे. नवीन फोनचा चिपसेट जास्त वेगवान आहे. तसंच ऑनलाईन गेमिंगचा अनुभव जास्त चांगला असेल, असा दावा कंपनीने केला आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदा ॲपल कंपनीने आपल्या फोनच्या किमती वाढवलेल्या नाहीत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.