बांगलादेशमध्ये (Bangladesh violence) इस्कॉनचे पुजारी चिन्मय कृष्ण दास (Priest Chinmoy Krishna Das) यांना अटक केल्यानंतर शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी बांगलादेशातील चितगाव येथे आणखी एका हिंदू पुजाऱ्याला अटक (Bangladesh Hindu priest arrested) करण्यात आली. अटक केलेल्या पुजारीचे नाव श्याम दास प्रभू असे आहे. चिन्मय कृष्ण दास यांना तुरुंगात भेटायला गेले असता श्याम दास प्रभू (Shyam Das Prabhu) यांना कोणत्याही अधिकृत वॉरंटशिवाय अटक करण्यात आली आहे. कोलकाता येथिल इस्कॉनचे उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राधारमण दास (Kolkata Spokesperson Radharaman Das) यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ही माहिती दिली. (ISKCON)
बांगलादेशात हिंदू समाजाने केले निदर्शन
बांगलादेशच्या इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा चेतना (इस्कॉन) चे माजी सदस्य हिंदू पुजारी चिन्मय कृष्ण दास (Hindu priest Chinmoy Krishna Das) यांना सोमवारी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तसेच मंगळवारी त्यांना चितगाव न्यायालयाने जामीन नाकारला. तसेच त्याच्या अटकेनंतर बांगलादेशची राजधानी ढाका आणि चितगावसह अनेक ठिकाणी हिंदू समुदायाच्या सदस्यांनी निदर्शने सुरू केली.
Does he look like a terrorist?#FreeISKCONMonks Bangladesh. The arrest of innocent #ISKCON brahmacharis are deeply shocking & disturbing. pic.twitter.com/VG6u7jlnXB
— Radharamn Das राधारमण दास (@RadharamnDas) November 30, 2024
(हेही वाचा- Ring Road Pune : पुण्यातील रिंगरोड भूसंपादनासाठी डिसेंबरची ‘डेडलाइन’ )
वकिलाच्या मृत्यूनंतर 46 अल्पसंख्याकांना अटक
इस्कॉनचे पुजारी चिन्मय कृष्ण दास (Hindu priest Chinmoy Krishna Das) यांना जामीन नाकारण्यात आल्यानंतर मंगळवारी चितगाव येथील न्यायालयाबाहेर पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात एका वकिलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी शनिवारी सांगितले की, सहायक सरकारी वकील सैफुल इस्लाम यांच्या हत्येप्रकरणी किमान नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी 46 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आले आहे, त्यापैकी बहुतांश अल्पसंख्याक हिंदू समाजातील आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community