Anil Ambani : अनिल अंबानी यांच्यावर सेबीची मोठी कारवाई, कंपनीचे शेअर गडगडले

Anil Ambani : अनिल अंबानी उद्योग समूहाच्या शेअरवर ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

121
Anil Ambani : अनिल अंबानी यांच्यावर सेबीची मोठी कारवाई, कंपनीचे शेअर गडगडले
  • ऋजुता लुकतुके

देशातील बडे उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यावर बाजार नियामक सेबीने मोठी कारवाई केली आहे. सेबीच्या या कारवाईमुळे अनिल अंबानी उद्योग समूहाच्या शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे शेअर्स चांगलेच गडगडले आहेत. त्यामुळे या कंपन्यांत गुंतवणूक असणाऱ्या गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. सेबीचा निर्णय आल्यानंतर उद्योग समूहाच्या लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स दिवसभरातील सर्वाधिक मूल्याच्या तुलनेत १७ टक्क्यांनी पडले आहेत. सेबीने अनिल अंबानी यांना इक्विटी मार्केटमध्ये भाग घेण्यास पाच वर्षांची बंदी घातली आहे. तसेच २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सेबीने अनिल अंबानी (Anil Ambani) उद्योग समूहावर कारवाई केल्याचे लक्षात येताच शेअर बाजारात खळबळ उडाली. सेबीच्या या निर्णयामुळे या उद्योग समूहाच्या कंपन्याचे शेअर्स गडगडले. रिलायन्स इन्फ्रा कंपनीचा स्टॉक २४३.६४ वरून २०१.९९ रुपयांपर्यंत साधारण १७ टक्क्यांनी घसरला. गुरुवारी या शेअरची किंमत २३५.७१ रुपये होती. गुरुवारच्या तुलनेत हा शेअर आज १४ टक्क्यांनी घसरला. याच उद्योग समूहातील रिलायन्स पॉवर या कंपनीचीही अशीच स्थिती राहिली. या कंपनीच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. या कंपनीचा शेअर वन डे हाय ३८.११ रुपयांवरून साडेनऊ टक्क्यांनी घसरला. रिलायन्स होम फायनान्स या कंपनीचा स्टॉकही ५ टक्क्यांनी घसरून ४.४५रुपयांच्या लोअर सर्किटवर आला.

(हेही वाचा – North East Mumbai Lok Sabha Constituency : कोटेचांचे पाय जमिनीवर…)

या कारणास्तव सेबीने घेतला हा निर्णय 

सेबीने उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यासह अन्य लोकांविरोधात मोठा निर्णय दिला आहे. यामध्ये रिलायन्स होम फायनान्सचे माजी विनियर एक्झिक्युटिव्हचाही समावेश आहे. या सर्वांना पुढच्या पाच वर्षांपर्यंत सिक्योरिटी मार्केटमध्ये भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. कंपनीला मिळालेल्या आर्थिक निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी सेबीने हा निर्णय दिला आहे. सेबीने अनिल अंबानी यांना २५ कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यासह अनिल अंबानी यांना सिक्योरिटी मार्केटमध्ये सहभाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

तसेच ते शेअर बाजारावर लिस्टेड कंपनीच्या संचालक किंवा प्रमुख व्यवस्थापकाच्या पदावर राहू शकणार नाहीत. रिलायन्स होम फायनान्स या कंपनीविरोधात २०१८-१९ साली एक तक्रार दाखल करण्यात आली होती. कंपनीला मिळालेला निधी अन्य ठिकाणी वळवल्याचा आरोप तेव्हा करण्यात आला होता. सेबीने नंतर या आरोपांची चौकशी केली होती. त्यानंतर आता सेबीने हा निर्णय घेतला आहे. (Anil Ambani)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.