Andhra Pradesh Train Accident : ‘या’ कारणामुळे घडला अपघात

22
Andhra Pradesh Train Accident : 'या' कारणामुळे घडला अपघात

आंध्रप्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यात झालेला (Andhra Pradesh Train Accident) रेल्वे अपघात ‘सिग्नल ओव्हरशुटिंग’मुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. यात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक लोक जखमी झाले आहे.

या अपघाताबाबत ईस्ट कोस्ट रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार हावडा-चेन्नई मार्गावर एका ट्रेनने सिग्नल (Andhra Pradesh Train Accident) ओलांडल्यानंतर आणि दुसऱ्या ट्रेनला धडकल्यानंतर अनेक डबे रुळावरून घसरले. हा अपघात रविवार २९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास झाला. विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन (गाडी क्र.08532) आणि विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल (गाडी क्र. 08504) यांच्यात धडक झाली. या २ गाड्यांची टक्कर मानवी चुकांमुळे झाली असावी.

मुख्य जनसंपर्क अधिकारी विश्वजीत साहू म्हणाले की, विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल ट्रेनने (Andhra Pradesh Train Accident) सिग्नलचे ‘ओव्हरशूटिंग’ केले होते. त्यामुळे दोन्ही गाड्या एकमेकांवर आदळल्या. जेव्हा एखादी ट्रेन रेड सिग्नलवर थांबण्याऐवजी पुढे जाते तेव्हा असे घडते. अपघातामुळे विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेनचे (ट्रेन क्रमांक 08532) मागील दोन डबे आणि विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजरचे लोको कोच (ट्रेन क्रमांक 08504) रुळावरून घसरले.

(हेही वाचा – Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी अशी करा नोंदणी)

या अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाने रेल्वेने (Andhra Pradesh Train Accident) मदतीसाठी 8912746330, 8912744619, 8106053051, 8106053052, 8500041670 आणि 8500041671 हे हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. अपघात मृत्यूमुखी पडलेल्या आंध्रप्रेदशातील मृतांच्या वारसांना १० लाखांची मदत आणि इतर राज्यातील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.