Andhericha Raja Mandal: दर्शनासाठी  येणाऱ्या गणेश भक्तांसाठी “हा” ड्रेसकोड

बाप्पाच्या दर्शनासाठी कोणते कपडे चालणार नाही याच पोस्टरचं मंडळानं प्रसिद्ध केलं आहे.

15
Andhericha Raja Mandal: दर्शनासाठी  येणाऱ्या गणेश भक्तांसाठी
Andhericha Raja Mandal: दर्शनासाठी  येणाऱ्या गणेश भक्तांसाठी "हा" ड्रेसकोड

सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी पाहायला मिळतेय. पण त्यातच आता मुंबईतील अंधेरीचे राजा मंडळ (Andhericha Raja Mandal) दर्शनासाठी यावेळी बनवलेल्या खास नियमांमुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे या गणेशोत्सव मंडळानं बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या गणेश भक्तांसाठी ड्रेसकोड ठेवला आहे. दर्शनासाठी  येणाऱ्या महिला आणि पुरूषांसाठी हा ड्रेसकोड लागू होणार आहे.

बाप्पाच्या दर्शनासाठी कोणते कपडे चालणार नाही याच पोस्टरचं मंडळानं प्रसिद्ध केलं आहे. या पोस्टरमध्ये महिलांनी शॉर्टस, स्कर्ट आणि पुरूषांनी हाफ पँट घालून आल्यास बाप्पाचं दर्शन घेता येणार नाही आहे. हा ड्रेसकोड केवळ फक्त महिलांसाठीच मर्यादीत नसून पुरूषांसाठी देखील लागू करण्यात आला आहे. दरम्यान असं म्हटलं जातं आहे की, या मंडळानं गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा फतवा काढला आहे. त्यातच एखाद्या कोणीही शॉर्टस किंवा हाफ पँट घालून आलं तर त्यांना लुंगी घालायला दिली जाते.

अंधेरीच्या राजाला यंदाही तोच ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तोकडे कपडे, मिनी स्कर्ट आणि स्लीव्हलेस कपडे घालून येणाऱ्या गणेशभक्तांना अंधेरीच्या राजाचे दर्शन घेता येणार नाही. आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीने ड्रेसकोड २०१२ साली लागू केला होता. तोकडे कपडे घालून आलेल्या २०० गणेशभक्तांसह एका अभिनेत्रीला अंधेरीच्या राजाचे दर्शन घेता आले नव्हते.

(हेही वाचा : Bacchu Kadu : “माझा शब्द चुकला…”; जळगावमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर अखेर बच्चू कडू यांनी मागितली माफी)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.