Anandacha Sidha : उत्सव तोंडावर पण… शिध्याचा ‘आनंद’ फक्त रव्यापुरताच

90
Anandacha Sidha : उत्सव तोंडावर पण... शिध्याचा 'आनंद' फक्त रव्यापुरताच
Anandacha Sidha : उत्सव तोंडावर पण... शिध्याचा 'आनंद' फक्त रव्यापुरताच

अमरावती 2 सप्टेंबर (हिं.स.) येत्या ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, १० सप्टेंबर रोजी गौरींचे आगमन होणार आहे. गौरी-गणपतीचा हा सण बघून राज्य शासनाने रेशनातून लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा (Anandacha Sidha) देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुरवठादाराकडून अमरावती जिल्ह्याला आतापर्यंत फक्त रवाच पाठविण्यात आला आहे अशी माहिती आहे. तर उर्वरित चार जिन्नस अद्याप मिळाल्या नसून यासाठी आणखी चार-पाच दिवस लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा कधी हाती येणार याबाबत सांगणे जरा कठीणच आहे.

(हेही वाचा- Shiv Sena UBT च्या माध्यमातून महाविकास आघाडीचा राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न?)

भाजप-शिंद गट शिवसेनेचे राज्यात सरकार आल्यानंतर या सरकारने गोरगरिबांच्या घरातही सण-उत्सवात गोडधोड तयार करता यावे यासाठी नंदाचा शिधा वाटपाचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून राज्य शासनाकडून सण-उत्सवात आनंदाचा शिधा रेशन लाभार्थ्यांना पुरविला जात आहे. आता ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, १० सप्टेंबर रोजी गौरींचे आगमन होणार आहे. अशात रेशन लाभार्थ्यांना परत एकदा आनंदाचा शिधा (Anandacha Sidha) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ५ प्रकारच्या जिन्नस असलेला हा आनंदाचा शिधा रेशन लाभार्थ्यांना रेशन दुकानांतून वाटप केला जातो. मात्र आता सप्टेंबर महिना सुरू झाला असूनही आनंदाच्या शिधामधील सर्व जिन्नस जिल्ह्याला मिळालेल्या नाहीत शिधामधील रवाच जिल्ह्याला मिळाला आहे, तर उर्वरित जिन्नससाठी आणखी चार-पाच दिवसांची वाट बघावी लागणार असल्याची माहिती मिळाली. यामुळे या जिन्नस मिळणार कधी व आनंदाच शिधा वाटप होणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.