Alandi : प्रदूषित इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी केला जातो कोट्यवधी रुपये खर्च

86
Alandi : प्रदूषित इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी केला जातो कोट्यवधी रुपये खर्च
Alandi : प्रदूषित इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी केला जातो कोट्यवधी रुपये खर्च

पवित्र इंद्रायणी (Indrayani) नदी पवना नदीपेक्षा अधिक प्रदूषित झाली आहे. इंद्रायणी नदीतील पाणी शुद्धीकरणासाठी महापालिकेला अधिकचा खर्च करावा लागत आहे. पवना नदीतील ५१० दशलक्ष लिटर (एम्.एल्.डी.) पाणी शुद्ध करण्यासाठी वर्षाला १० कोटी रुपये खर्च होतात, तर इंद्रायणी नदीतील ८० दशलक्ष लिटर पाणी शुद्धीकरणासाठी ७ कोटी रुपये खर्च होतात, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. (Alandi)

(हेही वाचा – यापुढे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून ‘पीओपीची गणेशमूर्ती स्थापन करणार नाही’, असे हमीपत्र घ्या; Bombay High Court चा आदेश)

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाहीत

पवना धरणांतून नदीवाटे आलेले पाणी रावेत येथील बंधार्‍यातून उचलले जाते. निगडी विभाग क्र. २३ येथे शुद्ध करून शहराला वितरित केले जाते. आंद्रा धरणातील पाणी निघोज येथील इंद्रायणी नदीतील बंधार्‍यातून घेतले जाते. नदीलगत चाकण, तळेगाव दाभाडे औद्योगिक विकास महामंडळ (एम्.आय.डी.सी.) परिसर आहे. या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाहीत. ते सांडपाणी थेट नदीमध्ये मिसळले जाते.

वर्षाकाठी ७ कोटी रुपयांचा खर्च

औद्योगिक आस्थापनांतील रसायनमिश्रित पाणीही नदीमध्ये सोडले जाते. इंद्रायणीचे पाणी अधिक प्रदूषित असल्याने शुद्धीकरणासाठी केमिकल आणि पावडर यांचा अधिकचा वापर करावा लागतो. परिणामी इंद्रायणीतून उचलण्यात येणार्‍या ८० दशलक्ष लिटर पाण्यावरील प्रक्रियेसाठी वर्षाकाठी ७ कोटी रुपयांचा खर्च करावा लागत आहे. (Alandi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.