अंधेरीतील Gokhale-Barfiwala Bridge च्या ‘त्या’ जोडणीचा अतिरिक्त भार; पावणेचार कोटींचा वाढला खर्च

331
अंधेरीतील Gokhale-Barfiwala Bridge च्या 'त्या' जोडणीचा अतिरिक्त भार; पावणेचार कोटींचा वाढला खर्च

सचिन धानजी, मुंबई

अंधेरी पूर्व व पश्चिम जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु करून एक मार्गिका सुरु केल्यानंतर त्याला जोडणाऱ्या सी. डी. बर्फीवाला मार्गाच्या जोडणीत अंदर निर्माण झाल्याने या दोन्ही उड्डाणपुलाच्या समांतर पातळीवर जुळवण्यासाठी ‘हायड्रॉलिक जॅक’ आणि ‘एमएस स्टुल पॅकिंग’चा वापर करून जोडण्याचे अतिशय आव्हानात्मक काम मुंबई महानगरपालिकेद्वारे सुयोग्यप्रकारे नुकतेच पूर्ण केले आहे. याअंतर्गत सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग एका बाजूला १,३९७ मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजूला ६५० मिमी वर उचलण्यात आला आहे. या कामासाठी तब्बल पावणे चार कोटी रुपये खर्च करण्यात आले असून गोखले पुलासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीने योग्यप्रकारे आराखडा न बनवल्याने महापालिकेचा नाव खराब होऊन त्यासाठी वेळ आणि पैसाही वाया गेला. मात्र, त्या संबंधित सल्लागार कंपनीवर महापालिकेने कोणत्याच प्रकारची कारवाई केल्याचे दिसून येत नाही. (Gokhale-Barfiwala Bridge)

(हेही वाचा – BJP ला नवीन अध्यक्ष डिसेंबरमध्ये मिळणार; पक्षाकडून निरिक्षकांची नियुक्ती)

सी. डी. बर्फीवाला (दक्षिण बाजू) पूल व बांधकाम सुरु असलेल्या गोपाळकृष्ण गोखले पूल जोडणीच्या कामासाठी महापालिकेला अतिरिक्त खर्च करावा लागला. या कामासाठी महापालिकेचा सुमारे पावणे चार कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाला आहे. या कामासाठी एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची निवड करून या कंपनीकडून हे काम महापालिकेच्यावतीने करून घेण्यात आले. गोखले पुलाची एक मार्गिका खुली केल्यानंतर बर्फीवाला पुलाच्या जोडणीत असमानता दिसून आल्यामुळे महापालिकेवर टिकेची झोड उठवण्यात आली होती. तसेच महापालिकेच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करण्यात आली होती. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हे काम हाती घेत या दोन्ही पुलाच्या समांतर जोडणीचे काम पूर्ण केले. (Gokhale-Barfiwala Bridge)

(हेही वाचा – इस्कॉनच्या Chinmoy Krishna Das यांच्या अटकेनंतर बांगलादेशी सरकारला भारताने सुनावले खडेबोल)

सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल एका बाजूला १,३९७ मिलीमीटर व दुसऱ्या बाजूला ६५० मिलीमीटर वरच्या दिशेने उचलण्यासाठी ‘हायड्रॉलिक जॅक’ आणि ‘एमएस स्टुल पॅकिंग’चा वापर करण्यात आला. त्याचबरोबर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाखाली पेडेस्टल (आधार देणारे खांब) वापरण्यात आले आहेत. एकूण दोन पेडस्टलचा आधार देत जोडणी करावयाचा भाग हा १,३९७ मिमी या उड्डाणपुलाचा गर्डर वर उचलण्यात आला. त्यासोबतच सहा नवीन बेअरींगही त्या साच्यात बसविण्यात आल्या. पेडस्टलला देण्यात आलेले ‘बोल्ट’ हे सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाच्या पिलरशी जुळणे हे अतिशय महत्त्वाचे आव्हान होते. अवघ्या २ मिमि जागेच्या अंतरामध्ये अतिशय अचुकपणे हे दोन्ही पेडेस्टल जुळवण्याचे आव्हान पूल विभागाचे अभियंता आणि सल्लागारांच्या तांत्रिक चमुने अतिशय नियोजनबद्धरीत्या व शास्त्रशुद्ध पद्धतीने जुळवून आणले. (Gokhale-Barfiwala Bridge)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.