अब्‍दुल कलाम बनले, तसेच ओसामा बिन लादेनही बनला; Ruta Awhad यांची मुक्ताफळे

160
अब्‍दुल कलाम बनले, तसेच ओसामा बिन लादेनही बनला; Ruta Awhad यांची मुक्ताफळे
अब्‍दुल कलाम बनले, तसेच ओसामा बिन लादेनही बनला; Ruta Awhad यांची मुक्ताफळे

जसे डॉ. ए.पी.जे अब्‍दुल कलाम (APJ Abdul Kalam) बनले, तशाच प्रकारे ओसामा बिन लादेनही (Osama Bin Laden) बनला. तो जन्मापासून ओसामा बिन लादेन नव्हता. त्याच्यातील चीड त्याला लादेन बनवण्यास कारणीभूत होती. त्याला समाजाने मोठे केले. हे जाणण्‍यासाठी त्‍याची जी‍वन कथा वाचा, अशी मुक्ताफळे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांच्‍या पत्नी ऋता आव्‍हाड (Ruta Awhad ) यांनी एका कार्यक्रमात बोलतांना केले.

(हेही वाचा – न्यूयॉर्कमध्ये झाली G20 बैठक; Jaishankar यांनी मांडला जागतिक सुधारणा क्षेत्रांवर भारताचा दृष्टीकोन)

हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर टीकेची झोड उठली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक आणि देशाचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम आणि कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेन याची तुलना केल्याने ऋता आव्हाड यांच्या राष्ट्रवादावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.

जितेंद्र आव्‍हाड यांनीही काही वर्षांपूर्वी चकमकीत मारली गेलेली जिहादी आतंकवादी इशरत जहाँ हिच्‍या कुटुंबियांची भेट घेऊन त्‍यांचे सांत्‍वन केले होते आणि आता त्‍यांच्‍या पत्नी कुख्‍यात जिहादी आतंकवादी लादेनची जी‍वन कथा वाचण्‍यास सांगत आहेत. यावरून या कुटुंबाची मानसिकताच जिहादी आहे, असे म्हटले जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.