आधार-मतदार कार्ड लिंकिंगची मुदत वाढवली! जाणून घ्या सोपी प्रक्रिया

4

केंद्र सरकारने आधार आणि मतदार कार्ड लिंक करण्याची कालमर्यादा वाढवली आहे. त्यामुळे आधार धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता ही सुविधा पुढील वर्षांपर्यत सुरू राहणार आहे.

( हेही वाचा : नितीन गडकरी धमकी प्रकरणात मंगळुरुमधून तरुणी ताब्यात; नागपूर पोलिसांचे पथक बेळगावला रवाना )

आतापर्यंत मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख १ एप्रिल २०२३ होती आता ही तारीख ३१ मार्च २०२४ करण्यात आली आहे. नागरिक ऑनलाइन किंवा एसएमएसच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

ऑनलाइन लिंक करण्याची प्रक्रिया

  • सर्वात आधी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलचे अधिकृत संकेतस्थळ https://nvsp.in/ ला भेट द्या.
  • यानंतर search in electoral roll वर क्लिक करा.
  • आधार क्रमांक, राज्य, जिल्ह्यासह वैयक्तिक तपशील देऊन सर्च बटणावर क्लिक करा.
  • आधारचे तपशील दिल्यानंतर युझर्जच्या मोबाईल क्रमांकावर एक ई-मेल किंवा ओटीपी येईल.
  • ओटीपी प्रविष्ट केल्यावर तुमचे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी लिंक होईल.

SMS द्वारे असे करा लिंक

  • मतदार ओळखपत्र क्रमांकानंतर स्पेस देऊन आधार क्रमांक टाका त्यानंतर १६६ किंवा ५१९६९ वर मेसेज करा.
  • आता आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याची प्रक्रिया सुरु होईल.
  • याशिवाय हेल्पलाइन क्रमांक १९५० वर फोन करूनही तुम्ही आधार मतदार ओळखपत्राशी लिंक करू शकता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.