Muslim : वासनांध मुसलमान आरिफने केला हिंदू अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

214

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिंदू अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याच्या घटनेमुळे तणावाचे वातावरण पसरले. सलून मालक आरिफवर (Muslim) विनयभंगाचा आरोप आहे. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी मिरवणूक काढून निषेध केला. आरोपींच्या दुकानाचीही तोडफोड करण्यात आली. शनिवारी, 31 ऑगस्ट 2024 रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार झालेल्या आरिफचा शोध सुरू केला.

ही घटना चमोली जिल्ह्यातील नंदनगरमध्ये घडली. याप्रकरणी शनिवारी अल्पवयीन पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, सलून चालवणारा २४ वर्षीय आरिफ अनेक दिवसांपासून पीडितेशी अश्लील हावभाव करत होता. सुरुवातीला पीडितेने या कृत्यांकडे दुर्लक्ष केले. 22 ऑगस्ट रोजी आरिफने पुन्हा एकदा पीडितेला अश्लील हावभाव केले. यावेळी पीडितेने रडत संपूर्ण हकीकत आईला सांगितली. (Muslim)

(हेही वाचा महाराष्ट्राची जनता मविआला विधानसभा निवडणुकीत जोड्याने मारणार; CM Eknath Shinde यांचा हल्लाबोल)

मुलीच्या वडिलांनी त्याच दिवशी पोलिसांत तक्रार दाखल करून आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, घटनेची माहिती हिंदू संघटनेच्या सदस्यांसह स्थानिक जनतेला समजली. स्थानिक लोकांनी आरिफच्या दुकानाची तोडफोड केली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना शांत केले. या घटनेच्या निषेधार्थ लोकांनी रॅली काढून घोषणाबाजी केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून इतर आवश्यक कारवाई करत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.