Wild Animals : राज्यात वर्षभरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ७०२१ प्राण्यांचा मृत्यू

वन्यप्राणी (Wild Animals) व मानव संघर्ष टाळण्यासाठी गावागावांत जागृती सुरू असून शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई दिली जात आहे

119
Wild Animals : राज्यात वर्षभरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ७०२१ प्राण्यांचा मृत्यू

राज्यातील जंगलात वन्यजीवांच्या हल्ल्याच्या (Wild Animals) घटनेत वाढ झाली आहे. परिणामी राज्यभरातील जंगलांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत ७ हजार २१ जनावरे ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील व्याघ्र (Wild Animals) प्रकल्प, अभयारण्य आणि जंगलांतील नैसर्गिक गवताचे प्रमाण कमी झाल्याने वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी सुरू आहे; तर दुसरीकडे पाळीव जनावरे जंगलात जाण्याचे प्रमाण वाढल्याने वन्यप्राण्यांकडून ठार होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यातच मागील काही वर्षात तृणभक्षक प्राण्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली. विस्तृत वनक्षेत्र आता मर्यादित होऊ लागले. पाळीव जनावरांची संख्या वाढून वनांवरील अवलंबनात देखील वाढ झाली. परिणामी, वनक्षेत्र घटल्याने तृणभक्षक प्राणी पिकांना लक्ष्य करीत आहेत असे तज्ञांनी सांगितले.

(हेही वाचा – Heat waves : राज्यात तापमानाचा पारा वाढला)

२०२२-२३ वर्षात वन्य प्राण्यांकडून (Wild Animals) पिकांच्या नुकसानीची ३७ हजार ६२३ प्रकरणे घडली. यामध्ये ५२२ जनावरे जखमी तर ७ हजार २१ प्राण्यांचा मृत्यू झाला. २०२०-२१ मध्ये पीक नुकसानीची ९७ हजार ७४२ प्रकरणे घडली. तर २०२१-२२ मध्ये पीक नुकसानीच्या ८७ हजार ६७५ घटना घडल्या. तसेच ८१५ जनावरे जखमी तर १२ हजार १४५ जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद महाराष्ट्र वन विकास विभागाच्या संकेतस्थळावरील टिपणीत नमुद आहे.

हेही पहा – 

दरम्यान वन्यप्राणी (Wild Animals) व मानव संघर्ष टाळण्यासाठी गावागावांत जागृती सुरू असून शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई दिली जात आहे असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानातून सौर उर्जा कुंपण-चेन लिक कुंपण दिले जात आहे. वनक्षेत्रात गुरे चरू नयेत, यासाठी मनरेगा व डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतून गावागावांत स्टॉल फीडिंगला चालना देणे सुरू आहे. नुकसान कमी करण्यासाठी पर्यायी पिकांबद्दल माहिती व प्रोत्साहन दिले जात आहे, असा दावा वन विभागाने केला आहे. (Wild Animals)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.