देशात ४ महिन्यांनंतर एका दिवसांत कोरोनाचे ७०० रुग्ण; महाराष्ट्रासह ६ राज्यांकडे लक्ष

86

भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सुमारे चार महिन्यांनंतर, भारतात ७०० हून अधिक नवीन प्रकरणे एकाच दिवसात नोंदवली गेली आहेत. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ७५४ नवीन रुग्ण आढळले आहेत. याची काळजी घेत केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी सहा राज्यांना पत्र लिहिले आहे.

गेल्या काही महिन्यांत कोविडच्या प्रकरणांमध्ये घट झाली होती, परंतु गेल्या एक आठवड्यापासून प्रकरणांमध्ये अचानक वाढ होत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे, अशा आशयाचे पत्र केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ज्या सहा राज्यांना पत्र लिहिले आहे. त्यात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. आरोग्य सचिवांनी पत्रात म्हटले आहे की, १५ मार्चपर्यंत प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्य सरकारांनी चाचणी, उपचार, ट्रॅक, लसीकरण यावर भर दिला पाहिजे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी या राज्यांचे मुख्य सचिव, प्रधान सचिव यांना पत्र लिहून आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच या प्रकरणावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोरोना चाचणी करणे, कोरोनाच्या प्रकरणावर सतत लक्ष ठेवणे, नवीन फ्लू, विषाणू किंवा इन्फ्लूएंझा यांचे निरीक्षण करणे, जीनोमिक सिंड्रोम चाचणी करणे आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतात एका दिवसात कोरोनाचे ७५४ नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर देशात कोरोना बाधितांची संख्या ४,४६,९२,७१० झाली आहे. त्याच वेळी, सक्रिय रुग्णांची संख्या ४,६२३ वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी १२ नोव्हेंबर रोजी देशात दररोज ७३४ संसर्गाची प्रकरणे समोर आली होती. कर्नाटकमध्ये संसर्गामुळे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर देशातील मृतांची संख्या ५,३०,७९० वर पोहोचली आहे.

(हेही वाचा मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.