Dahi Handi 2024 : दहीहंडी साजरी करताना करु नका ‘या’ चुका, अन्यथा जाल जेलमध्ये

147
Dahi Handi 2024 : दहीहंडी साजरी करताना करु नका 'या' चुका, अन्यथा जाल जेलमध्ये

दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडी (Dahi Handi 2024) सणाला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून नियमावली आखण्यात आली आहे. आखून दिलेल्या नियमांचे भंग करणाऱ्याला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. मुंबईत साजरा होणाऱ्या दहीहंडीला मुंबईतून मोठ्या प्रमाणात गोविंदा पथके जागोजागी बांधण्यात येणाऱ्या दहीहंड्या फोडण्यासाठी निघतात. राजकीय पुढाऱ्यांकडून हा सण हायजॅक करण्यात आला आहे.

(हेही वाचा – विधानसभेसाठी मनसेचा सातवा उमेदवार जाहीर; वणीतून Raj Thackeray यांची घोषणा)

दहीहंडी (Dahi Handi 2024) आयोजकांकडून लाखोंच्या हंड्या बांधल्या जातात, या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांत चुरस लागलेली असते. या दरम्यान काही गोविंदा पथकांकडून हुल्लडबाजी करण्यात येते. महिला, मुलींना बघून अश्लील शेरेबाजी करणे, तरुणीची छेड काढणे असले प्रकार सुरु असतात. सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी फेकणे आणि अश्लील बोलणे यामुळे जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण होते, हे प्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१, कलम ३७ च्या पोटकलम (१) चे खंड (सी), (ई) आणि (एफ) कलम २ चे पोटकलम (६), कलम १० चे पोटकलम (२) या अंतर्गत पोलीस उपायुक्त (अभियान) गणेश गावडे यांनी काढलेल्या आदेशात खालील कृत्यांवर बंदी आणण्यात आली आहे.

(हेही वाचा – Napal Bus Accident: नेपाळमध्ये भीषण अपघात; १४ भारतीय ठार)

या कृत्यांवर बंदी

१) सार्वजनिकरित्या अश्लील शब्दांचे उच्चार किंवा घोषणा किंवा अश्लील गाणी गाणे.
२) हातवारे किंवा नक्कल प्रस्तुतीकरणांचा वापर आणि तयार प्रतिमा, चिन्हे, फलक, किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे प्रदर्शन किंवा प्रसार करणे ज्यामुळे प्रतिष्ठा, शालीनता किंवा नैतिकता दुखावते.
३) पदचाऱ्यांवर रंगीत पाणी किंवा फवारे, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे.
४) रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे किंवा फेकणे यांच्यावर बंदी.

हे करताना आढळून आल्यास गोविंदा पथकांवर गुन्हे दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Dahi Handi 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.