गणेशोत्सवात PMP ला १७ कोटी ४३ लाखांचे उत्पन्न

122
गणेशोत्सवात PMP ला १७ कोटी ४३ लाखांचे उत्पन्न

गणेशोत्सवात थेट बाजारपेठांपर्यंतच्या सुखकर प्रवासासाठी पीएमपीला (PMP) प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रवासी संख्या वाढल्याने पीएमपीच्या उत्पन्नातही भरीव वाढ झाली असून, यंदाच्या गणेशोत्सवात १ कोटी २८ लाख ५६ हजार ५९ प्रवाशांनी पीएमपी सेवेचा लाभ घेतला. त्यातून पीएमपीला साडेसतरा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

(हेही वाचा – Tirupati Laddu Prasadam : हिंदूंच्या मंदिरांतील प्रसादामध्ये होणाऱ्या भेसळीच्या विरोधात Ranjit Savarkar यांनी दोन महिन्यांपूर्वीच उघडली मोहीम)

पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवासाठी राज्यासह देशभर आणि परदेशातून भाविक येत असतात. गणपती बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत शहराच्या मध्यवर्ती भागासह परिसरात देखावे पाहण्यासाठी आणि बाजारपेठांत खरेदीसाठी येणाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे रस्त्यावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने कोंडीतच वेळ जातो. त्यात पार्किंगचा प्रश्नही गंभीर असतो. त्यामुळे बहुतांश नागरिक स्वत:ची वाहने घरी किंवा जवळच्या बसस्टाॅप परिसरात लावून पीएमपीने (PMP) प्रवास करण्यास अधिक पसंती देतात.

(हेही वाचा – शनिवारपासून Coastal Road सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंतच राहणार खुला)

पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपी (PMP) थेट शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत सेवा देते. तेही नाममात्र तिकीटदरात. त्यामुळे गणेशोत्सवात प्रवासी संख्या अधिक वाढते. त्यासाठी पीएमपीकडून अडीचशेहून अधिक जादा बसचे नियोजन केले. दररोज १ हजार ४०० ते १ हजार ७०० च्या आसपास मार्गांवर बस धावत होत्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.