Coastal Road Project च्या एकूण खर्चात १३०० कोटींनी वाढ; प्रकल्पाचा खर्च पोहोचला १४०३०.१० कोटींवर

680
Coastal Road Project च्या एकूण खर्चात १३०० कोटींनी वाढ; प्रकल्पाचा खर्च पोहोचला १४०३०.१० कोटींवर
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सेतूच्या वरळी भागाकडील टोकापर्यंत असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पांच्या एकूण खर्चात तब्बल सुमारे १३०० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. या प्रकल्पासाठी १२, ७२१.५९ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली होती. परंतु हा प्रकल्प आता शेवटच्या टप्प्यात आले असून या प्रकल्पांचा एकूण खर्च आता १४०३०.१० कोटी पर्यंत पोहोचला आहे. (Coastal Road Project)

(हेही वाचा – BJP ला नवीन अध्यक्ष डिसेंबरमध्ये मिळणार; पक्षाकडून निरिक्षकांची नियुक्ती)

कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस या भाग एकच्या कामासाठी ५२९०.५४ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती. या कामासाठी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीची निवड केली आहे. तर बडोदा पॅलेस जे वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडील टोक या भाग दोन साठी ३२११.०० कोटी रुपये मंजूर करून या कामासाठी एचसीसी एचडीसी या संयुक्त भागीदारातील कंपनीची निवड केली होती. तर भाग चार अंतर्गत प्रिन्सेस स्ट्री उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क या कामासाठी लार्सन अँड टुब्रो कंपनीची निवड करून त्यासाठी ४२२०.०४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. अशाप्रकारे एकूण १२,७२१.५९ कोटी रुपयांच्या एकूण प्रकल्प खर्चाला मान्यता देण्यात आली होती. वस्तू व सेवाकरासह एकूण प्रकल्प खर्चात ३३९.३२ कोटी रुपयांची वाढ झाल्याने या प्रकल्पाचा सुधारीत खर्च १३०६०.९० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. (Coastal Road Project)

(हेही वाचा – Dapoli Agricultural University ची आंबा उत्पादनाबाबत अनास्था; सरकारने लक्ष घालण्याची शेतकर्‍यांची मागणी!)

परंतु त्यानंतर कोळी बांधवांच्या बोटी जाण्यास येणाऱ्या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी दोन खांबामधील अंतर वाढवण्यासाठी एकल खांबी बांधकामाचा वापर केल्यामुळे या प्रकल्प खर्चात ९२२.९२ कोटींनी वाढ झाल्याने या प्रकल्पांचा एकूण खर्च तब्बल १३,९८३.८३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला गेला. परंतु आता त्यात नवीन टेट्रापॉड बसवण्याच्या कामासाठी ४७.२७ कोटींचा खर्च झाल्याने याचा एकूण सुधारीत खर्च हा १४०३०.१० कोटींवर जावून पोहोचला गेला आहे. त्यामुळे कोस्टल रोड प्रकल्पाचा एकूण खर्चात तब्बल १३०९ कोटींनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. (Coastal Road Project)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.