Wrestler agitation : आम्ही कोणत्याही चाचणीसाठी तयार आहोत – बजरंग पुनिया

बृजभूषण रविवारी म्हणाले होते की, मी माझी नार्को टेस्टे, पॉलीग्राफी टेस्ट व लाय डिटेक्टर टेस्ट करण्यास तयार आहे.

21

भाजप खासदार व कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचे नार्को टेस्टचे आव्हान कुस्तीपटूंनी स्वीकारले. सोमवारी बजरंग पुनिया म्हणाला की, आम्ही कोणत्याही चाचणीसाठी तयार आहोत. हे सर्वकाही सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हायला हवे. संपूर्ण देशाला प्रश्नोत्तरे ऐकायला मिळावीत म्हणून नार्को टेस्ट लाईव्ह व्हायला हवी.

बृजभूषण रविवारी म्हणाले होते की, मी माझी नार्को टेस्टे, पॉलीग्राफी टेस्ट व लाय डिटेक्टर टेस्ट करण्यास तयार आहे. पण माझ्यासोबत विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांनीही ही टेस्ट करावी, अशी माझी अट आहे. त्यांनी मीडियाला बोलावून यासंबंधीची घोषणा करावी.

(हेही वाचा Azad Maidan Riot : धर्मांध मुसलमान आरोपी मोकाट, पीडित न्यायाच्या प्रतीक्षेत!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.