Raj Thackeray यांच्या दौऱ्याने विदर्भात मनसेच्या इंजिनला मिळेल का बळ?

84
Raj Thackeray यांच्या दौऱ्याने विदर्भात मनसेच्या इंजिनला मिळेल का बळ?
Raj Thackeray यांच्या दौऱ्याने विदर्भात मनसेच्या इंजिनला मिळेल का बळ?

लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर आता विदर्भातील जिल्ह्यात राज ठाकरे दौरा करीत आहेत. या दौऱ्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील राज ठाकरेंकडून केली जात आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांना पुन्हा नवचेतना मिळाली असली तरी आगामी निवडणुकीत (Vidhansabha Election 2024) मनसेला विदर्भ साथ देईल का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Raj Thackeray)

लोकसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. आता आगामी विधानसभा निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आघाडी, युतीच्या चर्चांमध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे. जागावाटपाच्या चर्चांना देखील उधाण आले आहे. तर दुसरीकडे आधीच स्वबळाचा नारा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही ऐकला चलो रे चा नारा देत आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे स्वतः राज्य पिंजून काढताना दिसत आहेत. मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर त्यांनी आता विदर्भातील जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात विदर्भातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा देखील राज ठाकरे करतांना दिसत आहेत. एककिडे अद्यापही कोणत्याच पक्ष, आघाड्यांकडून एकाही उमेदवारांची घोषणा झाली नाही. मात्र दुसरीकडे राज ठाकरे यांनी काही उमेदवारांची घोषणा करीत युती आणि आघाडीसोबत जाण्याचे दारे बंद केली असल्याची चर्चा आहे. तर उमेदवार घोषित करून निवडणूकीच्या प्रचारातही आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता मनसेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. विधानसभा निवडणुकीत स्वबळाची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यास देखील सुरुवात केली आहे. (Raj Thackeray)

(हेही वाचा – कांदिवलीत Skill Development Training Center; येत्या तीन वर्षांत दहा हजार युवक युवतींना मिळणार प्रशिक्षण)

या उमेदवारांची घोषणा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या आधी मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर तसेच पंढरपूर मधून दिलीप धोत्रे यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर मराठवाडा दौऱ्यावर असताना लातूर ग्रामीणमध्ये संतोष नागरगोजे तर हिंगोली विधानसभा मतदारसंघातून बंडू कुटे यांच्या उमेदवाराची घोषणा केली होती. त्यानंतर आता विदर्भातील चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून मनदीप रोडे तर राजुरा विधानसभा मतदारसंघातून सचिन भोयर यांच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. तर आता वणी विधानसभा क्षेत्रातून राजू उंबरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एका पाठोपाठ एक उमेदवार मनसेकडून जाहीर करण्यात येत आहेत. आधीच उमेदवार जाहीर केल्याने प्रचार करण्यासाठीही उमेदवारांना जास्त वेळ मिळणार आहे. (Raj Thackeray)

(हेही वाचा – मविआच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत Sharad Pawar यांचं मोठं विधान, म्हणाले…)

विदर्भ देईल का साथ?

मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या विदर्भातील जिल्ह्याच्या (MNS Vidarbha District Visit) दौर्यावर आहेत. या दौऱ्यात ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चाचपनी करताना दिसत आहेत. राज ठाकरेंच्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. उमेदवार ही घोषित करण्यात येत आहेत. मतदारसंघातील मनसेच्या ताकदीचा राज ठाकरे आढावा घेतांना दिसत आहेत. मात्र खरंच विदर्भ मनसेला आगामी निवडणुकीत साथ देईल का? राज ठाकरे यांचा दौरा आगामी विधानसभा निवडणूकीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरेल का? या प्रश्नाचे उत्तर सध्या जरी अनेक जण शोधत असले तरी आगामी निवडणुकीच्या निकालानंतरच याचं खरं उत्तर मिळणार आहे. हे मात्र निश्चित! (Raj Thackeray)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.