दोन वर्षे तरी मुख्यमंत्रिपद मिळणार का? Ajit Pawar प्रीतिसंगमावर म्हणाले…

148
दोन वर्षे तरी मुख्यमंत्रिपद मिळणार का? Ajit Pawar प्रीतिसंगमावर म्हणाले...
दोन वर्षे तरी मुख्यमंत्रिपद मिळणार का? Ajit Pawar प्रीतिसंगमावर म्हणाले...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निकाल जाहिर झाला आहे. राज्यात 230 जागांवर महायुतीने (Mahayuti) दणदणीत विजय मिळवला आहे. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीला (MVA) ५० चा आकडाही गाठता आला नाही. यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. (Ajit Pawar)

आमचं आम्ही बघू
अजित पवार (Ajit Pawar) आज (25 नोव्हेंबर) साताऱ्यातील कराड येथे प्रतिसंगमावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तुम्हाला दोन वर्षे तरी मुख्यमंत्रिपद मिळणार का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, “इतरांनी काय बोलायचं ते बोलावं. प्रत्येकाने आपल्या जवळ काय आहे हे पाहायला पाहिजे. आमची काळजी करू नये. आमची काळजी करायला आमचे आमदार, महायुती, माझ्या पक्षासोबत असणारे नेते, कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत. आमचं आम्ही बघू.” (Ajit Pawar)

आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्याच विचाराने पुढे जात आहोत
यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील महिला मतदारांचेही आभार मानले. आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्याच विचाराने पुढे जात आहोत. आमच्या प्रत्येक फ्लेक्सवर यशवंतराव चव्हाण यांचाच फोटो असतो. आणखी किती दिवस आम्हाला नाव ठेवणार आहात. 1978 साली जी घटना घडली त्याला यशवंतराव चव्हाण यांचा पाठिंबा होता का. सगळं सोईचं राजकारण चालत नाही. आम्ही केलं की ते चुकीचं म्हटलं जातं. आम्ही शिव,शाहू, फुले, आंबेडकर यांच्याच विचाराने चालत आहोत. असंही अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.