धारावी पुनर्विकासाला विरोध करणारे उद्धव ठाकरे अरविंद वैश्यच्या हत्येवर गप्प का? BJP चा सवाल

132

धारावीत बजरंग दलाचा कार्यकर्ता अरविंद वैश्य याची हत्या करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. या हत्येवरून राजकरण आता तापले आहे. आता भाजपाने यावर उबाठाला लक्ष्य केले आहे. कारण या हत्येवर उबाठाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

अरविंद वैश्य याच्या हत्येवर भाजपाने ट्विट करून उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले आहे. या ट्विटमध्ये भाजपाने म्हटले की, धारावी पुनर्विकासाला विरोध करण्यासाठी सतत पत्रकार परिषद घेणारे उद्धव ठाकरे, धारावीतील हिंदुत्ववादी अरविंद वैश्य या तरुणाची हत्या झाल्यावर तुष्टीकरणासाठी कोणत्या बिळात लपून बसले आहेत? औरंगजेब फॅन क्लब फारच मनावर घेतले आहे का @OfficeofUT?

(हेही वाचा रेल्वेच्या पुणे विभागाचे विषय लवकरच मार्गी लागणार; Murlidhar Mohol आणि रेल्वेमंत्र्यांमध्ये सविस्तर चर्चा)

भाजपाने पुन्हा एकदा उबाठाच्या हिंदुत्वावर बोट ठेवून डिवचले आहे. लोकसभेत उबाठाने मुस्लिम मतांचे तुष्टीकरण केले, त्यामुळे भाजपाने आता उबाठाला धारावीतील हत्येवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.